Anarase Recipe: दिवाळीच्या फराळात बनवा खुसखुशीत आणि गोड अनारसे, वाचा ही सोपी स्पेशल रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

अनारसे बनवण्यासाठी २ कप तांदूळ, १ कप गूळ, २ ते ३ चमचे खसखस आणि तळण्यासाठी तूप किंवा तेल घ्या. गुळाचे प्रमाण गोडीनुसार कमी-जास्त करू शकता.

Anarase Recipe

तांदूळ भिजत ठेवा

तांदूळ स्वच्छ धुऊन ३ दिवस पाण्यात भिजत ठेवा. दररोज पाणी बदलून तांदूळ पुन्हा स्वच्छ पाण्यात भिजवा. तिसऱ्या दिवशी तांदूळ निथळून स्वच्छ कापडावर वाळवा.

Anarase Recipe

तांदळाची बारीक पूड करा

तांदूळ पूर्णपणे वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. त्यानंतर चाळणीने पीठ चाळून घ्या, जेणेकरून अनारसे बनवताना त्याचा पोत चांगला राहील.

Anarase Recipe

गूळ आणि तांदळाचे पीठ एकत्र करा

तांदळाच्या पिठात गूळ मिसळून मऊसर पीठ मळा. मिश्रण खूप कोरडे वाटल्यास थोडे दूध वापरू शकता. पीठ झाकून काही तास किंवा रात्रभर मुरू द्या.

Anarase Recipe

अनारशांना आकार द्या

पिठाचा छोटा गोळा घ्या आणि खसखशीवर हलकेच थापून गोल, चपट्या आकाराचा अनारसा तयार करा. अनारसा फार पातळ करू नका, अन्यथा तळताना तुटू शकतो.

Anarase Recipe

मंद आचेवर अनारसे तळा

कढईत तूप किंवा तेल गरम करा. अनारसे खसखस लावलेली बाजू वर ठेवून मध्यम ते मंद आचेवर तळा. ते सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढा. तेल अतिशय गरम नसावे.

Anarase Recipe

थंड करून साठवून ठेवा

तळलेले अनारसे टिश्यू पेपरवर किंवा जाळीवर काढून पूर्ण थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद डब्यात साठवा. यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा टिकण्यास मदत होते.

Anarase Recipe

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

Makeup Tips | Saam Tv
येथे क्लिक करा