Shreya Maskar
या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर उत्तम चित्रपट, वेब सिरीज, शोजचा धमाका होणार आहे. नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, प्राइम व्हिडिओवर नवीन कंटेंट येणार आहे. 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान OTT वर काय काय पाहायला मिळणार, जाणून घेऊयात.
'मोटू पतलू: स्टोन एज ॲडव्हेंचर' १२ ऑक्टोबरला 'जिओ हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. हिंदी भाषेत ही सीरिज पाहायला मिळेल.
'मोटू पतलू: स्टोन एज ॲडव्हेंचर' नावाची एक हिंदी मालिका येत आहे. खास लहान मुलांसाठी तयार केलेली ही ॲनिमेटेड मालिका, लोकप्रिय पात्र मोटू आणि पतलू यांच्या नवीन कथेवर आधारित असेल.
सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस २०' शो हिंदी भाषेत 'जिओ हॉटस्टार' पाहायला मिळेल. हा शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
'कॉफी विथ करण सीझन ९' जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १४ ऑक्टोबर रिलीज होणार आहे. हा शो हिंदीमध्ये पाहता येईल.
करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा अंतिम ९वा सीझन घेऊन येत आहे. या शोचा प्रीमियर १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दर आठवड्याला नवीन एपिसोड प्रदर्शित होतील.
'रोडीज रिबर्थ' प्रसिद्ध रिॲलिटी शो १६ ऑक्टोबरपासून जिओ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. यात सहा गँग लीडर्स सहभागी आहेत.
ओजी टीममध्ये निखिल चिनाप्पा, नेहा धुपिया आणि प्रिन्स नरुला यांचा समावेश आहे, तर न्यूजी टीममध्ये अभिषेक मल्हान, बानी जे आणि बसीर अली यांचा समावेश आहे.