Gautami Patil : 'केवड्याचं पान तू...'; नऊवारीचा थाट अन् नथीचा नखरा, गौतमीचा मराठमोळा अंदाज | लेटेस्ट PHOTOS

Shreya Maskar

गौतमी पाटील

गौतमी पाटील ही नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिची गाणी कायम इंटरनेटवर ट्रेडिंगवर पाहायला मिळतात. आजवर ती अनेक टिव्हीच्या कार्यक्रमात दिसली आहे.

Gautami Patil | instagram

नवीन गाणे

गौतमी पाटीलचे नुकतेच नवीन गाणे रिलीज झाले आहे, ज्याचे नाव 'काठी ना घोंगडं घेऊन द्या की रं... मला बी जत्रेला येऊन द्या की !' असे आहे. या गाण्यात त्या गायक चंदन कांबळे यांच्यासोबत दिसत आहेत.

new song | instagram

लेटेस्ट फोटोज

गौतमीने गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे तिच्या सुंदर लूकचे फोटो शेअर केले आहेत. ज्यावर चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहे. गाण्यात गौतमी 'देवीचा जागर' करताना दिसत आहे.

Latest photos | instagram

मराठमोळा लूक

फोटोमध्ये गौतमीचे तीन लूक पाहायला मिळत आहे. तिने तिन्ही लूकमध्ये मराठमोळा लूक केला आहे. तिचे सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल.

Marathmola look | instagram

पहिला लूक

नारंगी रंगाची पारंपरिक साडी, भरपूर सोन्याचे दागिने आणि हिरव्या बांगड्यांसह आकर्षक लूकमध्ये गौतमी दिसत आहे. केसात गजरा माळला आहे. कपाळावर मोठी टिकली लावली आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य काळजात घर करते.

First look | instagram

दुसरा लूक

पिवळ्या-हिरव्या नऊवारी साडीमध्ये पारंपरिक दागिने आणि नथीसह सुंदर मराठमोळा अंदाजात गौतमी दिसत आहे. तिच्या गळ्यातील दागिन्याने लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या डान्समधील कातिल अदांचे कौतुक होत आहे.

second look | instagram

तिसरा लूक

हिरव्या-केशरी साडीत गौतमी खूपच सुंदर दिसत आहे. तिने मोकळे केस सोडले आहे. नथ, ठुशी आणि पारंपरिक दागिन्यांचा साज तिने केला आहे. तिच्या चेहऱ्यावर देवीची भक्त-भाव दिसत आहे.

Third look | instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

चाहत्यांनी कमेंट्समध्ये हार्ट इमोजीचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिलं की, "तू खूपच छान दिसते" , दुसऱ्या युजरने लिहिलं की, "खूप छान, तुम्ही देवी दिसत आहात..."

Comments from fans | instagram

NEXT : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

Gautami Patil | SAAM TV
येथे क्लिक करा...