'रामायण' चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बक्कळ कमाई
'रामायण' सिनेमाचे ओटीटी अपडेट समोरे आले
'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत रिलीज होणार
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा भव्य चित्रपट रिलीज होत आहे. चित्रपटाच्या थिएटर रिलीज आधीच ओटीटी रिलीजचे अपडेट समोर आली आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise of a Legend) या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये छप्परफाड कमाई सुरू आहे.
'रामायण' चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' चित्रपट जिओहॉटस्टार (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. तसेच त्यांनी सांगितले की, चित्रपटगृहांमधील प्रदर्शनाचा कालावधी संपल्यानंतर, प्रेक्षक 'जिओहॉटस्टार'वर 'रामायण' चित्रपट स्वतंत्रपणे पैसे देऊन पाहू शकतील. हे पाहण्यासाठी त्यांना नेहमीच्या ओटीटी सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही. या 'पे-पर-व्ह्यू' मॉडेलमुळे प्लॅटफॉर्मला थेट प्रेक्षकांच्या खरेदीतून महसूल मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र अद्याप रिलीज डेटबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
'रामायण' मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, साऊथ अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेराय, कुणाल कपूर आणि काजल अग्रवाल यांसारख्या अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
'रामायण' चित्रपटाला संगीतकार ए. आर. रहमान आणि हन्स झिमर यांनी संगीत दिले आहे. 'रामायण' चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरात रिलीज होणार आहे. चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी भाषांत प्रदर्शित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.