Kangana Ranaut: काय सांगता! कंगनाने दीपिकाचे केले तोंडभरुन कौतुक, पोस्ट करत म्हणाली...

Kangana Ranaut Praises Deepika Padukone: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या कामावरुन ट्रोल करणाऱ्या कंगनानेही दीपिकाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केले.
Kangana Ranaut Praises Deepika Padukone
Kangana Ranaut Praises Deepika PadukoneInstagram
Published On: 

Deepika Padukone At Oscar 2023: ऑस्कर २०२३ भारतासाठी फारंच खास होता. भारताला यावर्षी ऑस्करमध्ये एकूण दोन पुरस्कार मिळाले असून महत्वाची बाब म्हणजे दीपिकाने ऑस्कर २०२३मध्ये प्रस्तुतकर्ती (Presentor)ची भूमिका निभावली होती. आनंद महिंद्रांनी गाण्यासोबतच दीपिकाचंही कौतुक केलं होतं. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या कामावरुन ट्रोल करणाऱ्या कंगनानेही दीपिकाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केले. सध्या कंगनाने दीपिकाच्या केलेल्या कौतुकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Kangana Ranaut Praises Deepika Padukone
Myra sings Song: माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीनं Real आई-बाबांसाठी गायलं गाणं

कंगना राणौतने अभिनेत्री दीपिका पदुकोणचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाचा एक व्हिडिओ शेअर करत कंगनाने ट्विट केले आहे की, "दीपिका पदुकोण इतकी सुंदर दिसते आहे, संपूर्ण देशासोबत एकाच वेळी एकत्र येत उभं रहाणं साधी गोष्ट नाही, तुमची प्रतिमा, प्रतिष्ठा त्या नाजूक खांद्यावर घेऊन उभी राहणे सोपे नाही. परदेशात एक भारतीय अभिनेत्री प्रेझेंटेटर म्हणून उभी राहणे फार महत्वाचं आहे. भारतीय महिला ठरवलं तर जग गाजवू शकतात या गोष्टीचं दीपिका पदुकोण जिवंत उदाहरण आहे."

दीपिका पदुकोणने एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर आरआरआर चित्रपटाबद्दल आणि त्यातील 'नाटू नाटू' या गाण्याविषयी प्रेक्षकांना आपल्या खास अंदाजात माहिती दिली. परदेशी कलाकारांनी 'नाटू नाटू' या गाण्यावर लाईव्ह परफॉर्म करत प्रेक्षकांकडून कार्यक्रमात स्टँडिंग ओव्हेशनही मिळालं होतं.

Kangana Ranaut Praises Deepika Padukone
Oscars Awards 2023: ऑस्कर जिंकलेल्या 'नाटू-नाटू' गाण्याचा अर्थ माहितीय का? गाणं हिट होण्यामागे आहे 'ही' कठोर मेहनत

RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला असून एमएम कीरावानी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले. चंद्रबोस यांनी गाणे लिहिले असून राहुल सिपलीगुंज-कालभैरव जोडीने गायले आहे. RRR चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी गाण्याला उत्तम प्रतिसाद दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com