Oscars Awards 2023: ऑस्कर जिंकलेल्या 'नाटू-नाटू' गाण्याचा अर्थ माहितीय का? गाणं हिट होण्यामागे आहे 'ही' कठोर मेहनत

तुम्हाला माहित आहे का 'नाटू-नाटू' या गाण्याची सिग्नेचर स्टेप बनवण्यासाठी किती वेळ लागला?, सोबतच गाण्याचा अर्थ काय?, आणि इत्यादी अशी महत्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
What Is Naatu Naatu Meaning
What Is Naatu Naatu MeaningSaam Tv

What Is Naatu Naatu Meaning: एस एस राजामौली दिग्दर्शित RRR चित्रपटाची सध्या भारतातच नाही परदेशातही हवा आहे. नुकताच चित्रपटाला ऑस्कर २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट मुळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. अशातच भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बातमी म्हणावी लागेल. साऊथच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'नाटू नाटू' गाणे बनवण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागली आहे.

तुम्हाला माहित आहे का या गाण्याची सिग्नेचर स्टेप बनवण्यासाठी किती वेळ लागला?, सोबतच गाण्याचा अर्थ काय?, आणि इत्यादी अशी महत्वपूर्ण माहिती या बातमीत आपण जाणून घेणार आहोत.

What Is Naatu Naatu Meaning
Oscars 2023 मध्ये कोणाला कोणते पुरस्कार मिळाले? एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती

जगभरातील सर्वच प्रेक्षकांना भुरळ घालणारे हे गाणे पहिल्यांदा तमिळ भाषेत बनवण्यात आले होते. सोबतच हा चित्रपट हिंदी भाषेत बनवण्यात आला असून हिंदीतही त्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या गाण्याने चित्रपटाला एक वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. अशातच हा चित्रपट ज्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला, त्या भाषांमध्ये त्याची म्युझिक, रिदम आणि डान्सच्या हूक स्टेप्स सारख्याच ठेवल्या आहे.

What Is Naatu Naatu Meaning
Oscars 2023: 'नाटु नाटु' हे फक्त गाणे नाही तर.... दीपिकाच्या व्हिडिओवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्विट चर्चेत

आपण नाटू नाटू हे गाणे अनेकदा ऐकले असेलच. गाणे प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याचे रिदमने भल्याभल्यांना ताल धरायला लावलं आहे, ही महत्वाची बाब. या लोकप्रिय गाण्याचे हिंदी व्हर्जन 'नाचो-नाचो' खूपच लोकप्रिय झाले असून कन्नड भाषिकांसाठी 'हल्ली नातू' तर मल्याळममध्ये 'करेंथॉल' आणि तमिळमध्ये 'नट्टू कूथू'या रिदमने प्रेक्षकांचे मन जिंकले.

नुकताच, ऑस्कर पुरस्कार मिळण्यापूर्वी गोल्डन ग्लोब 2023 मध्ये गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या गाण्यावर परदेशी सेलिब्रीटींनी हूक स्टेप करत कार्यक्रमाला चार चाँद लावले.

What Is Naatu Naatu Meaning
Oscar Awards 2023: RRR ने इतिहास रचला! 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला ऑस्कर अवॉर्ड; देशासाठी अभिमानाचा क्षण..

या गाण्याचे चित्रीकरण आणि हूक स्टेप्स ज्या पद्धतीने सादर करण्यात आल्या आहेत, ते खरंच खूप सुंदर आहे. त्याचे श्रेय नृत्य दिग्दर्शक (Choreographer) प्रेम रक्षित यांना जाते. नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षित यांनी कठोर परिश्रमानंतर या हूक स्टेप्स मध्ये अनेक सुधारणा केल्या आणि त्या ज्युनियर एनटीआर-रामचरण यांना शिकवल्या. एका मुलाखतीत ज्युनियर एनटीआर सांगत होते की, गाण्याच्या हूक स्टेप्स दिसायला खूप कठीण वाटतात, पण खरं तर त्या सोप्या होत्या, पण त्यांनी त्या अवघड केल्या होत्या, मी हे खरं बोलत नसून फक्त मस्तीमध्ये बोलतोय.

What Is Naatu Naatu Meaning
Oscars 2023: 'नाटु नाटु'च्या संगीतकारचा आनंद गगनात मावेना; ऑस्कर मिळाल्यानंतर गाण्यातून व्यक्त केल्या भावना

ज्युनियर एनटीआर आरआरएच्या प्रमोशन दरम्यान सांगत होते की, जेव्हा आम्ही हा डान्स शिकत होतो त्यावेळी मला आणि राम चरणला खूपच प्रॅक्टिस करावी लागली होती. या स्टेप आम्हाला दोघांनाही १८ वेळा स्टेप कराव्या लागल्या होत्या. १८ व्या प्रॅक्टिसमध्ये ती स्टेप बरोबर येऊ लागली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com