Oscar Awards 2023: RRR ने इतिहास रचला! 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला ऑस्कर अवॉर्ड; देशासाठी अभिमानाचा क्षण..

Oscar Awards: एसएस राजामौली यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यानं (Naatu Naatu) ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे....
 Natu Natu Song
Natu Natu Song Saam Tv

Los Angeles: ऑस्कर २०२३ (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिसमध्ये सुरू आहे. यामधून सध्या एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत असून आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. या बातमीने भारतीय प्रेत्रकांना सुखद धक्का दिला आहे. या गाण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या गाण्यानं गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील पटकावला होता. आता या गाण्यानं ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. (Latest Marathi News)

 Natu Natu Song
Sanjay Raut News: फडणवीसांना लिहले पत्र! 'दौंडच्या भीमा साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार...' राऊतांचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार आपल्या नावे व्हावा, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. कारण एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्यानं बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. अप्लॉज (टेल इट लाइक अ वुमन), होल्ड माय हँड (टॉप गन मॅव्हरिक), लिफ्ट मी अप (ब्लॅक पाथेर वाकांडा फॉरेव्हर), आणि दिस इज ए लाइफ (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स) या गाण्यांना मागे टाकत ‘नाटू नाटूने’ ऑस्कर पटकावला. (Entertainment)

‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ने बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्म पुरस्कार..

तसेच भारताच्या ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ने बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांनी मंचावर हा पुरस्कार स्वीकारला. ‘माझी मातृभूमी, भारताला मी हा पुरस्कार समर्पित करत आहे’, असं दिग्दर्शिका कार्तिकी यावेळी म्हणाल्या

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com