Oscars 2023 मध्ये कोणाला कोणते पुरस्कार मिळाले? एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती

Oscars 2023 Winners: अखेर ऑस्कर पुरस्कार जाहीर झाले असून भारताने यंदा दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
Oscar 2023 Award Winner List
Oscar 2023 Award Winner ListSaam Tv

Oscars 2023 Award Winner List: जगातील कलाकारांसाठी सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्करची चर्चा सुरु होती. अखेर ऑस्कर पुरस्कार जाहीर झाले असून भारताने यंदा दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले. RRR मधील Naatu Naatu या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर आणि सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटात ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ पुरस्कार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी हा एक मोठा दिवस आहे.

Oscar 2023 Award Winner List
Rakhi Sawant: राखीने एमसी स्टॅनची उडवली खिल्ली, ८० हजाराचे शूज पाहून नेटकऱ्यांच्या जीवाचा तिळपापड

इतर श्रेणींबद्दल बोलत असताना, ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर ब्रेंडन फ्रेझरला द वेलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच, मिशेल योहला 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. मिशेल योह ही ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब जिंकणारी पहिली दक्षिण आशियाई अभिनेत्री आहे. चला तर एक नजर टाकूया कोणाकोणाला कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत.

Oscar 2023 Award Winner List
Oscars 2023: भारताची ऑस्करमध्ये दमदार कामगिरी; The Elephant Whisperers ठरली सर्वोकृष्ट शॉर्ट फिल्म

सर्वोत्कृष्ट अभिनेता - ब्रेंडन फ्रेझर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मिशेल योह

सर्वोत्कृष्ट चित्रपट - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट

सर्वोत्कृष्ट ऑरिजनल साँग - नाटू नाटू

सर्वोत्कृष्ट साउंड - टॉप गन: मेवरिक

सर्वोत्कृष्ट अडेप्टेड स्क्रीन प्ले - सारा पोली

सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग - एवरीथिंग एवरीवेयर ऑल एट वन्स

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीन प्ले - एवरीथिंग एवरीवेयर ऑल एट वन्स (Everything Everywhere All at Once)

सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी - ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट

सर्वोत्कृष्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स एंड द हॉर्स (The Boy, the Mole, the Fox, and the Horse)

सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म - द एलिफेंट व्हिसपर्स (The Elephant Whisperers)

सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाईन - ब्लैक पैंथर: वकांडा फॉएवर (Black Panther: Wakanda Forever)

सर्वोत्कृष्ट इंटरनेशनल फीचर फिल्म - ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट (All Quiet on the Western Front)

सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म - नैल्वनी (Navalny)

सर्वोत्कृष्ट लाइव एक्शन शॉर्ट - एन इरिश गुडबाय (An Irish Goodbye)

सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग एक्टर- के हुई क्वान (Ke Huy Quan)

सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग एक्ट्रेस - जेमी ली कर्टिस (Jamie Lee Curtis )

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेयरस्टाइल - द व्हेल (The Whale)

सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फीचर फिल्म- 'गिलर्मो डेल टोरो की पिनोचियो' (Guillermo del Toro’s Pinocchio)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com