Israel News: इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा अखेर भारतात परतली

Nushrratt Bharuccha Came From Israel: अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलहुन भारतात परतली आहे.
Nushrratt Bharucha Back in India From Israel
Nushrratt Bharucha Back in India From Israel Saam TV
Published On

Nushrratt Bharuccha Back In India:

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलहुन भारतात परतली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलहुन भारतात परतली आहे. नुसरत मायदेशी परतल्यानंतर ANI ने ट्वीट करत तिचे अपडेट शेअर केले आहेत.

नुसरत भरुचाचे भारतीय विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने अद्याप माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विमानतळावर नुसरतला माध्यमांनी घेरल्यानंतर अभिनेत्री त्यांना म्हणालाय की, 'मी घरी आली आहे, मला माझ्या घरी जाऊ द्या.'

नुसरतच्या टीमने ती भारतात येण्याआधी अपडेट शेअर केली होती.नुसरतच्या टीमने 'ANI'ला सांगितले होते की, 'अखेर आमचा नुसरातशी संपर्क झाला आहे. दूतावासाच्या मदतीने तिला भारतात आणण्यात येणार आहे. नुसरत सुखरूप असून ती भारतात येत आहे.'

नुसरत भरुचा हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायल गेली होती. काल तिच्या टीम मेंबर्सनी नुसरत इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती दिली होती. शनिवारी रात्री १२:३० वाजता तिच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी तिने तळघरात आश्रय घेतला होता आणि ती सुरक्षित होती. नुसरत भारतात परतल्याने देशातल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Celebrity)

Nushrratt Bharucha Back in India From Israel
Karan Patel On Bollywood: गटबाजी नसेल तर निम्म्या कलाकारांचं दुकान बंद होईल; बॉलिवूडवर भडकला TV अ‍ॅक्टर करण पटेल

पॅलेस्टिनी दहशतवादी गट 'हमास'ने इस्रायलवर हल्ला केल्याने संपूर्ण जग हादरून गेलं आहे. शनिवारी 'हमास'ने इस्रायलवर २० मिनिटांत ५००० हजार रॉकेट सोडले. यानंतर इस्रायलने देखील पॅलेस्टाईन प्रत्युत्तर देत अनेक हवाई हल्ले केले. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तेढ अधिकच वाढली आहे. या हल्ल्यात ३०० हुन अधिक लोकांचा मृत्यु झाला असून १०००हुन अधिक लोक या जखमी झाले आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com