Karan Patel On Bollywood: गटबाजी नसेल तर निम्म्या कलाकारांचं दुकान बंद होईल; बॉलिवूडवर भडकला TV अ‍ॅक्टर करण पटेल

Karan Patel Movie: करण पटेल 'डरन छू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Karan Patel's Debut Movie ‘DarranChhoo’
Karan Patel's Debut Movie ‘DarranChhoo’ Instagram @karan9198
Published On

Karan Patel Slam Bollywood:

'ये हे मोहब्बतें' मालिका फेम अभिनेता करण पटेलने बॉलिवूडवर संताप व्यक्त केला आहे. टीव्ही कलाकारांविषयी हिंदी सिनेसृष्टीचे जे मत आहे त्यावर करण पटेलने नाराजी व्यक्त केली आहे. करण पटेलने नुकत्याच एका मुलाखतीत टीव्ही स्टार्सविषयी सिनेसृष्टीतील लोकांचे जो 'खुंटलेले विचार' आहे त्याविषयी मत व्यक्त केले आहे. करण पटेल 'डरन छू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

'ये हे मोहब्बतें' या मालिकेत रमन भल्ला हे पात्र साकारून करण पटेल देशाच्या घराघरात पोहोचला. करण पटेलने म्हटलं आहे की, हिंदी सिनेसृष्टीत गटबाजी नसती तर अर्ध्या अभिनेत्यांचे दुकान बंद झाले असते. परंतु आता गोष्टी बदलत असल्याने करण आनंदी आहे.

करण पटेलने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत म्हटले सांगितले की, 'मला वाटते की प्रत्येकजण आपल्या लोकांही बाजू घेतात. जर गटबाजी होणार नसेल आणि जर इंडस्ट्री इमानदार झाली तर अर्ध्या कलाकारांचे (अभिनेता/अभिनेत्री) दुकान बंद होईल. गोष्टी बदलत आहेत. कारण प्रेक्षक जास्त हुशार झाले आहेत. चांगला कंटेन्ट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत.' (Latest Entertainment News)

करण पटेल पुढे म्हणाला की, 'मला वाटत आपल्या इंडस्ट्रीचा एकच प्रॉब्लेम आहे. परंतु मला असं वाटत की आपल्याला नवीन पद्धतीचा सिनेमा बघायचा आहे. पण आपल्याला कलाकार जुनेच हवेत. जर तुम्हाला नवीन पद्धतीचा सिनेमा पाहायचा असेल तर त्यात कुठेतरी नवीन कलाकार देखील असायला हवेत ना. तेच जुने चेहरे नवीन चित्रपट करत आहेत, हे अजिबात चांगलं नाहीये.'

करण पटेलने टीव्ही कलाकारांविषयी बॉलिवूड करत असलेला विचार आणि देत असलेली वागणूक यावर देखील भाष्य केले आहे.

Karan Patel's Debut Movie ‘DarranChhoo’
Salman Khan Post: सलमान खानसोबतची 'ती' मुलगी कोण?, पोस्टने वेधलं लक्ष

करण पटेलने सांगितले की, 'इंडस्ट्रीमधील लोक अजूनही हाच विचार करतात की हे टीव्ही स्टार आहेत, हे मोठ्या पडद्यावर काम करणार नाहीत.' करणने म्हणाला हा खूप खुंटलेला विचार आहे. ही विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. यामुळे खूप त्रास होतो.

टीव्हीवर काम करणारे कलाकार चित्रपटातील कलाकारांपेक्षा मोठे स्टार असल्याचा विश्वास देखील करणने यावेळी व्यक्त केला. करण म्हणाला, 'गेल्या सहा वर्षांपासून टीव्हीवर एक टॉप शो चालवणारा तो टेलिव्हिजनचा चेहरा आहे, तर तो तुमच्या फिल्म स्टारपेक्षा जास्त लोकप्रिय आणि मार्केटेबल आहे.

'डरन छू'विषयी बोलायचे झाले तर करण पटेलने त्याची पत्नी अंकिता भार्गवसोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आशुतोष राणा देखील आहे. 13 ऑक्टोबर रोजी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com