Marathi Natak: नाट्यगृहात राजकीय कार्यक्रम नको, निर्मात्यांची सरकार दरबारी धाव

अशातच शनिवार आणि रविवारी नाट्यगृहात होणाऱ्या राजकीय, शासकीय कार्यक्रमांमुळे नाटकांचे प्रयोग रद्द करण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी नाटक निर्मात्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.
Auditorium
Auditorium Saam Tv

Marathi Natak: मराठी नाट्यसृष्टी नाटकप्रेमींचे गेल्या कित्येक दिवसांपासून निखळ मनोरंजन करत आहे. नाट्यसृष्टीने प्रेक्षकांना दर्जेदार नाटकेही दिली आहेत. सध्या नाट्यगृहात नाटकांचे प्रयोगही जोरात सुरू आहेत. कोरोना काळात सर्वांनाच फटका बसला होता, त्याप्रमाणे नाट्यसृष्टीलाही फटका बसला आहे.

बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर आता नाट्यसृष्टी पुन्हा एकदा भरारी घेताना दिसत आहे. या उत्तुंग भरारीमध्ये नाटकांचे दमदार प्रयोग सुरू आहेत. यामध्ये नाटकांच्या शोमध्ये हाऊसफुलच्याही पाट्या लागताना दिसत आहेत.

Auditorium
Tiger 3: 'टायगर ३'मध्ये दिसणार हा नवा चेहरा, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अशातच शनिवार आणि रविवारी नाट्यगृहात होणाऱ्या राजकीय, शासकीय कार्यक्रमांमुळे नाटकांचे प्रयोग रद्द करण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी नाटक निर्मात्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. 'शनिवार आणि रविवार नाट्यगृहात कोणताही राजकीय अथवा शासकीय कार्यक्रम नको, हे दोन दिवस नाट्यगृह नाटकांसाठीच असावे.'

अशी मागणी नाट्य निर्माता संघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राजकीय कार्यक्रमांमुळे नाटकांचे प्रयोग रद्द होतात. त्यामुळे याचा निर्मात्यांना फार मोठा फटका बसतो.

Auditorium
Bigg Boss 16: आम्ही चोर वाटतो का? संतापलेल्या सलमानकडून शालीन-अर्चनाची खरडपट्टी

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना नाट्य निर्माता संघाचे कार्यवाह दिलीप जाधव म्हणतात, 'शनिवार, रविवार नाटकांच्या तारखा घेतल्या जातात. ३ महिन्यांच्या तारखांचे वाटप करून प्रयोग लावले जातात. त्याप्रमाणेही कलाकारांच्या तारखा घेतल्या जातात. बऱ्याचदा कलाकारांच्या तारखा, वेळही फिक्स नसतात. तसेच कधी कधी कलाकार एकाच वेळी दोन दोन नाटकांमध्ये असल्याने वेळ जमत नाही. या अनेक बाबी पाहून आम्ही कार्यक्रम शेड्युल्ड करतो. नाटकाच्या काही दिवस आधी जाहिरात प्रदर्शित केलेली असते. ऑनलाईन टिकिट बुक केले जाते. "

Auditorium
Godavari: नदीविषयी कटुता आणि प्रेम असणाऱ्या 'गोदावरी'साठी नदीची आरती

तसेच पुढे दिलीप जाधव म्हणतात, 'अशा आयत्यावेळी आम्हाला प्रयोग रद्द करायला लागल्याने आम्हाला पैसे परत करावे लागतात. याचा सर्वाधिक फटका निर्मात्यांना बसतो. शनिवार- रविवार सोडून इतरत्र दिवस कधीही तुम्ही राजकीय कार्यक्रम भरवा. आमचा या गोष्टीला काहीच विरोध नाही.

कारण २ वर्ष चित्रपटसृष्टीला बराच मोठा फटका सहन करावा लागला आहे. आता कुठे व्यवस्थित सर्व रुळावर येत आहे. प्रेक्षकांचे पाय नाट्यगृहाकडे हल्ली हल्ली वळायला लागले आहेत. यावेळी शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये प्रेक्षकांना सर्वाधिक वळवण्याचा प्रयत्न करत आहे.'

Auditorium
Bigg Boss Marathi 4: कॅप्टन बनण्यासाठी यशश्री उत्सुक, अमृता आणि तेजश्रीकडे मागितली मदत

नाट्य निर्माता संघाने सरकारकडे केलेल्या मागणीवर सरकार सकारात्मक असल्याचे दिलीप जाधव म्हणाले, तसेच ते पुढे बोलले, 'सरकार आमच्या मागणीवर सकारात्मक आहे. आज दुपारी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर बैठक आहे. केवळ नाट्यगृहात होणारे राजकीय कार्यक्रम नसून अनेक मुद्दे आम्ही निवेदनात मांडले आहे.

ज्यात रंगमंच कामगारांच्या अडचणी, हॉस्पिटॅलिटी, विमा, नाटकांना व्यावसायिक दर्जा मिळायला हवा. अशा अनेक मागण्या आम्ही सरकारकडे केल्या आहेत. आता त्यातील किती मागण्या पूर्ण होतात हे पाहावं लागेल'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com