Tiger 3: 'टायगर ३'मध्ये दिसणार हा नवा चेहरा, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'टायगर ३' चित्रपटात दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांची भाची आणि अभिनेत्री रिद्धी डोगरा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Tiger 3
Tiger 3Saam Tv

Tiger 3: सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर चाहते खूप लक्ष देऊन असतात. त्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेता सलमान खानही असेल यात काहीच शंका नाही. सलमानच्या चाहत्यांची संख्या खूप आहे. त्याचे चाहते भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. सध्या सलमानचा आगामी चित्रपट 'टायगर ३' बद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहे.

Tiger 3
Bigg Boss 16: आम्ही चोर वाटतो का?संतापलेल्या सलमानकडून शालीन-अर्चनाची खरडपट्टी

सलमान मुख्य भूमिकेत असलेल्या दोन्ही भागात चाहत्यांनी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला होता. 'टायगर ३'मध्ये काय नवीन पाहायला मिळणार यासाठी सर्वच उत्सुक आहेत. राजकारणी आणि सेलिब्रिटी हे समीकरण खुपच वेगळं आहे. बरेच सेलिब्रिटी राजकारणात सक्रिय आहे. 'टायगर ३' चित्रपटात दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांची भाची आणि अभिनेत्री रिद्धी डोगरा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Tiger 3
Godavari: नदीविषयी कटुता आणि प्रेम असणाऱ्या 'गोदावरी'साठी नदीची आरती

या सिनेमाच्या माध्यमातून रिद्धी आणि सलमान पहिल्यांदाच एका चित्रपटात दिसणार आहे.चित्रपटात रिद्धी आणि सलमानची काय भूमिका असणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. रिद्धी डोगराने चित्रपटात यश मिळत नसल्याने मालिकांमध्ये तिने काम करण्यासाठी सुरुवात केली.

Tiger 3
Bigg Boss Marathi 4: कॅप्टन बनण्यासाठी यशश्री उत्सुक, अमृता आणि तेजश्रीकडे मागितली मदत

तिने 'सात फेरे: सलोनी का सफर', 'मर्यादा: लेकीन कब तक ?', 'कबूल है', 'बहू हमारी रजनीकांत' यांसारख्या मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'मर्यादा: लेकीन कब तक ?' मालिकेतून अभिनेत्रीला वेगळी ओळख मिळाली.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com