Bigg Boss Marathi 4: कॅप्टन बनण्यासाठी यशश्री उत्सुक, अमृता आणि तेजश्रीकडे मागितली मदत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्कमध्ये समृद्धी आणि यशश्रीला कॅप्टनपदाची उमेदवारी मिळाली आहे.
Bigg Boss Marathi Daily Update
Bigg Boss Marathi Daily UpdateInstagram/ @colorsmarathi

Bigg Boss Marathi 4 Latest Update: मराठी टेलिव्हिजनवर सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस. जवळपास महिनाभरापासून सुरु असलेल्या या कार्यक्रमात स्पर्धकांची चांगलीच मैत्री झालेली दिसत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस न आलेल्या स्पर्धकाला एलिमिनेट झालेले सुद्धा आपण पहिले आहे. अशा एकमेकांचे वैरी वाटणारे स्पर्धक घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकासाठी ओक्साबोक्शी रडताना आपण पाहिलेले आहे.

Bigg Boss Marathi Daily Update
Kangana Ranaut: 'अति घाई संकटात नेई', कंगनाला ओव्हर एक्साइटमेंट पडली महागात

यावेळीच्या बिग बॉसच्या सीझनची थीम 'ऑल इज वेल' अशी आहे. या थीमचे नाव ऐकल्यावर नक्की वाटेल की, घरात सर्व आलबेल सुरु आहे पण सध्या तरी आलबेल नसल्याचे स्पष्टपणे दिसुन येत आहे. प्रत्येक स्पर्धक एकमेकांसोबत आपले नाते अधिकाधिक घट्ट करत, त्यांना सेफ करण्याच्या प्रयत्नात दिसुन येत असतो.

Bigg Boss Marathi Daily Update
Samantha Ruth Prabhu: समांथा दिसणार अॅक्शन पटात, स्टंटने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष

बिग बॉसच्या घरात आतापर्यंत एकूण तीन स्पर्धकांना घराबाहेर जावे लागले. दरम्यान प्रत्येकाला आवडणारा दिवस म्हणजे चावडीचा. मांजरेकर कोणाला काय बोलणार याची प्रत्येकाला उत्सुकता असते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्कमध्ये समृद्धी आणि यशश्रीला कॅप्टनपदाची उमेदवारी मिळाली आहे.

आता या दोघींमध्ये कॅप्टीन्सीचे कार्य पार पडणार आहे. याबाबत आज या दोघींमध्ये चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये यशश्रीचे म्हणणे आहे की, तेजस्विनी आणि ग्रुपने तिच्या बाजूने खेळावे. आजच्या टास्कमध्ये काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi Daily Update
Wonder Women Trailer: 'वंडर वूमन' अमृताने दिली गुडन्युज, ट्रेलरने चाहत्यांचे लक्ष वेधले

यशश्री तेजस्विनीला म्हणते की, "माझी अशी इच्छा आहे तुम्ही दोघींनी माझ्या बाजूने खेळावे. कारण जरी तुम्हांला मी तुमची वाटत नसले तरी देखील ही टीम अजूनही माझीच आहे. तेजस्विनी म्हणते, मला तुझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की तू पटकन स्नॅप होतेस. त्यावर यशश्री म्हणाली, तुला पहिल्या आठवड्यापेक्षा माझी improvement दिसत नाहीये ? यावर तेजस्विनी म्हणते, तू आता दोन तीन आठवडे तिथे खेळलीस.

यशश्रीने अमृताला बजावून सांगितले की, मी आता तुझ्याशी बोलत नाहीये. तेजाशी बोलते आहे. त्यावर अमृता म्हणते, तुम्ही दोघी बाजूला जाऊन बोला. आणि इथून वादाला सुरुवात झाली... यशश्री म्हणाली, तुला जायचं तर तू जा... तू मला प्रत्येकवेळी जा नाही बोलू शकत. तू दोन वेळा मला जा बोलीस. यावर अमृता म्हणते, मी तुला कधी जा बोले... ही काय वेडी आहे का? ... यशश्रीचे फक्त एकच मत आहे, तुला त्रास होत असेल तू जा मी आणि तेजा नाही जाणार...

Bigg Boss Marathi Daily Update
Badaas Ravi Kumar: हिमेशच्या नव्या चित्रपटाची चर्चा, समीक्षकांकडून टीझरची उडवली खिल्ली

थीमप्रमाणे पाहिल्यास अद्याप घरात आलबेल दिसत नाही. आता हा वाद सुद्धा पुन्हा किती विकोपाला जाणार हे आजच्या भागात कळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com