Marathi Actress : ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला, नेमकं कारण काय?

Usha Chavan Returns Award : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीने राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला आहे, यामागचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.
Usha Chavan Returns Award
Marathi Actresssaam tv
Published On
Summary

ज्येष्ठ अभिनेत्रीने राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्रीशी संवाद साधला.

मालमत्तेच्या वादामुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे.

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण या गेल्याकाही दिवसांपासून मालमत्तेच्या प्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. अशात आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री उषा चव्हाण यांना पुण्यातील जमिनीच्या वादात न्याय न मिळाल्याने त्यांनी निषेध करत आपल्या अभिनय कारकि‍र्दीत कमावलेले सर्व शासकीय पुरस्कार शासणाला परत केले आहेत. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

उषा चव्हाण या ठाण्यातील टेंभी नाका इथल्या आनंदआश्रमात गेल्या होत्या. तेथे त्यांनी फोनवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या टीडीआर व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं वाद काय?

उषा चव्हाण यांचा पुण्यातील धनकवडीतल्या एका जमिनीचा वाद आहे. गेल्या २६ वर्षांपासून पुण्याच्या धनकवडी भागातील त्यांच्या कौटुंबिक मालकीच्या जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता. मात्र तरीही पुण्यातील खाजगी बिल्डरने या जमिनीचा टीडीआर आपल्या नावे केल्याने उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर केला.

उषा चव्हाण यांनी आपल्या अभिनयासोबतच नृत्यानेही चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्यांच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. उषा चव्हाण या मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या महत्त्वपूर्ण कामासाठी त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. १९७० आणि १९८० च्या दशकातील सर्वात प्रतिष्ठित नायिकांपैकी एक आहेत.

Usha Chavan Returns Award
Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखची गगन भरारी! 'राजा शिवाजी'ची १०० कोटींच्या क्लबमध्ये दमदार एन्ट्री, लवकरच रचणार मोठा इतिहास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com