Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखची गगन भरारी! 'राजा शिवाजी'ची १०० कोटींच्या क्लबमध्ये दमदार एन्ट्री, लवकरच रचणार मोठा इतिहास

Raja Shivaji Box Office Collection Day 17 : 'राजा शिवाजी' चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. रितेश भाऊंचा चित्रपट लवकरच मराठी आवृत्तीत इतिहास रचणार आहे. वीकेंडला किती कमावले, जाणून घेऊयात.
Raja Shivaji Box Office Collection Day 17
Riteish - Raja Shivaji CollectionSAAM TV
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला.

रितेश भाऊंनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या 'राजा शिवाजी' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपट रिलीज होऊन २ आठवडे पूर्ण झाले आहेत आणि आता तिसरा आठवडा सुरू आहे. चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाची १७ व्या दिवसाची एकूण कमाई जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १७

'राजा शिवाजी' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चित्रपटगृहांमधून ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात या कमाईमध्ये आणखी २४.३० कोटी रुपयांची भर पडली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १७ व्या दिवशी रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने २,२२३ शोजमधून ३.४५ कोटी रुपयांची कमाई केली. यापैकी हिंदी आवृत्तीने ०.५५ कोटी रुपये तर मराठी आवृत्तीने २.९० कोटी रुपयांची कमाई केली. यासह, चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई १००.०७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे तर भारतातील एकूण नेट कमाई ८४.५५ कोटी रुपये इतकी झाली.

  • पहिला आठवडा (हिंदी): १६.४० कोटी रुपये; (मराठी): ३६.२५ कोटी रुपये

  • ८ वा दिवस (हिंदी): ०.७० कोटी रुपये; (मराठी): २.५० कोटी रुपये

  • ९ वा दिवस (हिंदी): १.३२ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • १० वा दिवस (हिंदी): १.८० कोटी रुपये; (मराठी): ५ कोटी रुपये

  • ११ वा दिवस (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.९० कोटी रुपये

  • १२ वा दिवस (हिंदी): ०.६५ कोटी रुपये; (मराठी): १.८५ कोटी रुपये

  • १३ वा दिवस (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.४० कोटी रुपये

  • १४ वा दिवस (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.४० कोटी रुपये

  • १५ वा दिवस (हिंदी): ०.२० कोटी रुपये; (मराठी): १.२५ कोटी रुपये

  • १६ वा दिवस (हिंदी): ०.४० कोटी रुपये; (मराठी): २.३० कोटी रुपये

  • १७ वा दिवस (हिंदी): ०.५५ कोटी रुपये; (मराठी): २.९० कोटी रुपये

  • एकूण: ८४.५५ कोटी रुपये

'राजा शिवाजी' चित्रपट 'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार

'राजा शिवाजी'ने रिलीजच्या १७ दिवसांत ८५ कोटी रुपये कमावले आहेत. नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने ९० कोटींची कमाई केली. 'राजा शिवाजी' ला 'सैराट'चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी ६ कोटी रुपये कमवावे लागतील. त्यानंतर 'राजा शिवाजी' हा भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरेल आणि इतिहास रचेल. आता तिसऱ्या आठवड्यात चित्रपट किती कमाई करतो, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Raja Shivaji Box Office Collection Day 17
Vijay-Rajinikanth Video : "मला प्रचंड धक्का बसला..."; CM विजय यांच्यावर रजनीकांत यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com