Famous Actress : वयामुळे काम करण्याची संधी हुकली; मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठ्या प्रोजेक्टमधून काढलं, सांगितला 'तो' वाईट अनुभव

Sonalee Kulkarni Losing Work Due To Age : मराठमोळी अभिनेत्रीला तिच्या वयामुळे मोठ्या प्रोजेक्टमधून काढण्यात आले. नेमका किस्सा काय, जाणून घेऊयात. यामुळे अभिनेत्रीला खूप मानसिक त्रास झाला.
Sonalee Kulkarni Losing Work Due To Age
Famous Actresssaam tv
Published On
Summary

सोनाली कुलकर्णीच्या हातून तिच्या वयामुळे मोठा प्रोजेक्ट गेला.

सोनालीची मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी हुकली.

सोनाली कुलकर्णी लवकरच 'तिघी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) सध्या तिचा आगामी चित्रपट 'तिघी' मुळे चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटाचे प्रमोशन करताना सोनाली दिसत आहे. ती एक उत्तम अभिनेत्रीसोबत कमाल डान्सर देखील आहे. तिने आजवर अनेक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने ' वयामुळे मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी गमावली' याचा खुलासा केला आहे.

आरपारला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने सांगितल्यानुसार, तिने अलिकडेच ओटीटीवरील एक शो साइन केला होता. ती लेखक-दिग्दर्शक आणि पूर्ण टीमला देखील भेटली. टीमने तिला भूमिकेबद्दल सर्व सांगितले. फी, शूटिंगच्या तारखा देखील ठरल्या होत्या. भूमिकेला अनुसरून तयार होऊन ती टीमला भेटायला गेली होती. या सर्वात 'तिघी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. थोड्याच दिवसांत त्यांनी सोनालीला सांगितले की, "आम्ही त्या भूमिकेसाठी वेगळी मुलगी कास्ट केली आहे." जेव्हा सोनालीने तिला काढून टाकण्याचे कारण विचारले तेव्हा तिला असे उत्तर आले की," तू आता वयाने मोठी दिसत आहेस"

तेव्हा सोनालीने विचारले की, "जेव्हा तुम्ही मला प्रत्यक्ष भेटलात तेव्हा तुम्हाला हे जाणवलं नाही का? आता अचानक वय कसं दिसले?" त्यावर ते म्हणाले, "आम्ही 'तिघी' चित्रपटाचा टीझर पाहिला आहे. त्यात तसेच दिसत आहे." तेव्हा पुन्हा सोनाली म्हणाली, " तसे दिसणे ही त्या भूमिकेची गरज आहे. तुम्ही लूक टेस्ट करा आणि मग ठरवा..." मात्र अखेर सोनालीच्या हातून तो प्रोजेक्ट गेला.

सोनाली काही दिवस याच विचारत होती. तिला लोकांनी फिलर्स करून घेण्याचा सल्ला देखील दिला. मात्र तिने स्वतःला ती आहे तसे स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कृत्रिम सौंदर्यात ती अडकली नाही. 'तिघी' चित्रपट 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसोबत ज्येष्ठ भारती आचरेकर आणि नेहा पेंडसे देखील झळकली आहे. चित्रपट पाहायला चाहते खूपच उत्सुक आहेत.

Sonalee Kulkarni Losing Work Due To Age
Bigg Boss Marathi 6 : एक नव्हे 'बिग बॉस'मध्ये थेट ३ वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री, घराचे तापमान वाढणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com