Breaking News

Swapnil Joshi : वर्ष संपताना स्वप्नीलनं दिली चाहत्यांना खास भेट; गुजराती चित्रपटात दमदार पदार्पण,सिनेमाचं नाव काय?

Swapnil Joshi Gujarati Movie : मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी आता लवकरच गुजराती चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर स्वप्नीलने मराठी मनोरंजन सृष्टी गाजवली आहे. त्याला नव्या भूमिकेत पाहायला चाहते देखील उत्सुक आहेत.
Swapnil Joshi Gujarati Movie
Swapnil JoshiSAAM TV
Published On: 

गुजराती सिनेमा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. 'शुभचिंतक' हा गुजराती सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील जोशी गुजराती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो कायम अनपेक्षित आणि ग्राउंडब्रेकिंग दोन्ही भूमिका अगदी उत्तमपणे साकारतो. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

2024 वर्षात स्वप्नील (Swapnil Joshi) ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आहे. प्रेक्षकांना स्वप्नील येणाऱ्या वर्षात एका नव्या कोऱ्या गुजराती चित्रपटात दिसणार आहे. स्वप्नील गुजराती चित्रपटात विश्वात पदार्पण करतोय ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. वैविध्यपूर्ण भूमिकाच्या सोबतीने बहुभाषिक चित्रपट करण्याकडे नेहमीच स्वप्नीलचा कल असतो. स्वप्नील जोशीचा पहिला गुजराती चित्रपट करण्यासाठी सज्ज आहे.

'शुभचिंतक' चित्रपटाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत आहे. गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या गाजलेल्या हिट चित्रपटांनंतर त्यांची ही चौथी निर्मिती असणार आहे. निसर्ग वैद्य दिग्दर्शित ज्यांनी यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ रांदेरियासोबत गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.त्यांनी हा चित्रपट डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचे सांगितले.

स्वप्नील जोशी चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला, "गुजराती चित्रपट उद्योग वेगाने विकसित होत आहे. वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती करत आहे. जी दूरवरच्या प्रेक्षकांना ऐकू येते आहे. सिनेमाची जादू सार्वत्रिक असावी यावर माझा नेहमीच विश्वास आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळे करायला मिळतेय याचा आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि आता तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. या भूमिकेने मला नक्कीच आव्हान दिले आहे. मात्र मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे. "

मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात दमदार पाऊल ठेवून कमालीचा अभिनय करणार आहे. स्वप्नी जोशीला 'शुभचिंतक' चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. आपल्या अभिनयाने स्वप्नीलने जगाला वेड लावले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. या चित्रपटाचे अद्याप कोणतेही रिलीज डेट अपडेट समोर आले नाहीत.

Swapnil Joshi Gujarati Movie
Ilu Ilu Movie : बॉलिवूड अभिनेत्रीचं मराठीत दमदार पदार्पण, प्रेमाची भावना हळूवार उलगडायला येणार एली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com