Bhutan PM Dasho Tshering Tobgay : भूतानमध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन : पंतप्रधान दाशो छेरिंग तोबगे यांची माहिती

Maharashtra Cultural Festival : भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करणार आहे.
Bhutan PM Dasho Tshering Tobgay
Bhutan PM Dasho Tshering TobgaySaam Digital
Published On

Bhutan PM In Maharashtra

भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचं देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असं प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशो छेरिंग तोबगे यांनी आज येथं केलं. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरू झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

जानेवारी महिन्यात पंतप्रधान झाल्यावर आपल्या पहिल्याच भारत भेटीवर आलेले भूतानचे पंतप्रधान दाशो छेरिंग तोबगे व त्यांच्या पत्नी ओम ताशी डोमा यांचे शनिवारी (दि. १६ मार्च) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शासनाच्या वतीने राजभवन, मुंबई येथे स्वागत केले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत आज फिक्कीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात टूर ऑपरेटर्स तसेच व्यापार व वाणिज्य प्रतिनिधींसोबत बैठक झाल्याचे सांगून महाराष्ट्र व भूतानमध्ये उभय पक्षी पर्यटन वाढविण्याबाबत आपण कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान छेरिंग तोबगे यांनी राज्यपालांना सांगितले.

भूतानचे लोक भारतीय चित्रपटांचे दर्दी असून भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण आमच्या देशात करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानला लवकरच भेट देणार असल्याचे आपल्याला आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतात सर्वात मोठी असून भूतानचे अनेक शुभचिंतक महाराष्ट्रात असल्याचे पंतप्रधान छेरिंग तोबगे यांनी सांगितले.

Bhutan PM Dasho Tshering Tobgay
Maharashtra Lok Sabha Election : अखेर चंद्रहार पाटील या पक्षाकडून लढणार निवडणूक? सांगलीच्या जागेवर हे दोन पक्ष होते आग्रही

भूतानचे अनेक पर्यटक महाराष्ट्रातील अजंता व वेरूळ लेण्यांना भेट देतात व अनेकांना महाराष्ट्रात येण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. भूतानचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असून हजारो मुले एनडीए येथून लष्करी प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. आपली देखील एनडीए मधून प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपण पुणे येथे येऊ शकलो नाही असे तोबगे यांनी सांगितले.

आपल्या पहिल्याच भारत भेटीमध्ये महाराष्ट्र भेटीवर आल्याबद्दल भूतानच्या पंतप्रधानांचे आभार मानून, राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने भूतान व महाराष्ट्रातील शैक्षणिक आदान प्रदान वाढवावे, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी व्यक्त केली.

Bhutan PM Dasho Tshering Tobgay
Devendra Fadnavis : काँग्रेस नसती तर काय झालं असतं,', पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्रे फडणवीसांचं टीकास्त्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com