Devendra Fadnavis : काँग्रेस नसती तर काय झालं असतं,', पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्रे फडणवीसांचं टीकास्त्र

Devendra Fadnavis On Congress : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोड न्याय यात्रेची आज समारोप सभा मुंबईतील शिवतीर्थावर होणार आहे. त्याआधी "काँग्रेस न होती तो क्या होता" या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Digital
Published On

Devendra Fadnavis

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोड न्याय यात्रेची आज समारोप सभा मुंबईतील शिवतीर्थावर होणार आहे. त्याआधी "काँग्रेस न होती तो क्या होता" या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी आज जो भारताचा बनावट विकास झाला आहे, तो झाला नसता, ३७० सारखी चूक झाली नसती, सशक्त भारत आज झाला असता, भारताचं विभाजन झालं नसतं, भ्रष्टाचाराची मालिका नसती असं म्हटलं आहे.

राजकारण आपल्या पुरतं मर्यादित ठेवलं

सत्तेतून पैसा अस राजकारण सुरू होतं,त्यातून अनेकांनी आपली साम्राज्य उभारली. पहिल्या ५० वर्षातील हे राजकारण ५० कुटुंबात फिरलं, काहींनी काही केलं पण काहींनी ते केवळ आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादीत ठेवलं. सामान्य माणूस कुठेच नव्हता मग त्यांना सांभाळायला गुंडांना ठेवावं लागलं. आधी मुख्यमंत्रीस राजकारणी अंडरवर्ल्ड कंट्रोल करतात की तेच त्यांना कंट्रोल करतात, असा प्रश्न पडू लागला, होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळं बदललं. त्यांनी दाखवून दिलं की या व्यतिरिक्त पण राजकारण करता येतं, दिग्गजांना सामान्य पराजित करू शकतात हे दाखवून दिलं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपने विचारधारा बदलली

वर्ल्ड ऑर्डर अमेरिका करतो बाकीचे ते स्वीकारतात तशीच राजकीय ऑर्डर काँग्रेस ने सुरू केली. भाजप एक असा पक्ष होता त्यांनी त्याची विचारधारा बदलली. मुलगा मुलगी राजकारणात यावा ही घराणेशाही नाही, मात्र चांगल्य केवळ चांगल्या लोकांना काढून दुसऱ्याला देणं स्वताकडे ठेवणं हा परिवारवाद आहे. राष्ट्रवादी म्हणूनच तुटली त्यांनी त्याचा वारसा म्हणून निर्माण केला, मात्र नंतर मुलीला पुढे आणलं. शिवसेनेनं देखील तेच केलं आदित्य ठाकरेंना पुढे आणलं. आम्हाला मोठी लढाई लढावी लागतं आहे, मात्र त्यांच्यामागे जाणारे देखील त्याला जबाबदार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Sanjay Raut News: वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडी... संजय राऊतांचं मोठं विधान

मी पुन्हा येईनवर काय म्हणाले?

मी पुन्हा येईन, हे एक वाक्य नव्हतं, मी कोणासाठी येईन? काय बदल करेन? हे सगळं होत. पण ती एक लाईन पकडण्यात आली. केवळ सत्ता आणि खुर्चीसाठी उध्दव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. नंतर अहंकारी असल्याची टीका करण्यात आली. पुन्हा यायला अडीच वर्ष लागली पण आलो तर असा आलो दोन पक्ष तोडून आलो.

ते म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. त्यानी स्वतःला राज्याभिषेक केला मात्र त्यांनी कधी ते गादी उपभोगली नाही, ना कधी त्यानी एक दिवस आराम केला आणि ते तात्काळ साम्राज्याच्या आणि जनतेच्या भलं करण्याच्या कामाला लागले.

जो देश मजबुत, तोच शांती प्रस्थापित करू शकतो

आम्हाला २०४७ चां चां विकासीत भारत बनवायचा आहे. मोदी जनतेचेची भावना जाणतात. ४०० पारची मोदींची भावना जनतेने समजून घेतली पाहिजे. लोक त्यांना तिसऱ्यांदा मोदींना संधी देणार आहेत. जो देश मजबुत असतो तोच शांती प्रस्थापित करू शकतो. आधीची सरकार केवळ निषेध व्यक्त करायची. पहिल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे त्यांच्या लक्षात आलं. आता त्यांची हिम्मत नाही. आता चीनची देखील हिम्मत नाही आपल्याकडे बघण्याची.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics: ब्रेकिंग! २ दिवसात माफी मागा अन्यथा... शिवसेना शिंदे गटाकडून ॲड. असिम सरोदेंना नोटीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com