Aditya Thackeray : भाजप नेते फक्त गुजराती लोकांसाठी काम करताय; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

Mumbai News : भाजपने गुजरातच्या घश्यात नोकऱ्या घातल्या. २०१४ च्या जाहीरनामा पहावा,
Aditya Thackeray
Aditya ThackeraySaam tv
Published On

गिरीश कांबळे

मुंबई : ज्यांनी बाळासाहेबांचा पक्ष तोडला फोडला आणि चोरून नेला, त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. भाजपाने आता याचे उत्तर द्यावे, की ज्या महाराष्ट्रातील पाच हजार तरुणांच्या नोकऱ्या गुजरातला का घेऊन गेले? मी कधी भाजपवरती वैयक्तिक बोललो नाही. पण आम्ही आमच्या स्वतःसाठी लढत, आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत. त्याच ठिकाणी भाजपवाले गुजरातच्या लोकांसाठी काम करत आहेत; असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.  

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, कि अमि शाह यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष पद कोणाला दिले हे पहिले सांगावे. कारण जर कोणत्या क्रिकेटरला हे दिले असते, तर बीसीसीआयचे आता चांगले झाले (Amit Shah) असते. परंतु या ठिकाणाहून सगळं पळवायचं काम हे फक्त भाजपला माहिती असल्याचे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. मनसेला भाजपाने पाठींबा दिलेला आहे. ज्या भाजपने गुजरातच्या घश्यात नोकऱ्या घातल्या. २०१४ च्या जाहीरनामा पहावा, त्यांनी किती जाहीरनाम्यामध्ये केलेल्या गोष्टी पाहिल्या व पूर्ण केल्या हे सुद्धा पाहावे. 

Aditya Thackeray
Pankaja Munde : बंडखोरी हा राजकारणाचा एक भाग; पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

महिलांना १५ हजार देणार होतो तेथे पंधराशे दिले 
महिलांना आधार देणे गरजेचे आहे. त्या योजनेमध्ये अजून वाढवून ही योजना दिलेली आहे. फक्त पंधराशे रुपये दिले नाही, तर या ठिकाणी प्रवास आणि बाकीच्या गोष्टी देखील देण्याचे वचन दिले होते. याशिवाय महिला ज्या ठिकाणी घर चालवतात, समाज चालवतात त्यांना आधार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. कुठेतरी या ठिकाणी १५ लाख रुपये देणार होतो. पण या सरकारने पंधराशे रुपये वरती आणला. शिंदे यांना तेव्हा बहीण नाही आठवली. ज्यावेळी बिलगिस बानू यांच्यावर अत्याचार झाला. 

Aditya Thackeray
Sushma Andhare : अमित शाह यांच्याकडून सल्ला घ्यावा इतके वाईट दिवस 'मातोश्री'चे आले नाहीत, ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्याची तोफ धडाडली

शिवतीर्थवरती नेहमीच सभा हे उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी रोखण्याचे कारण नाही. भाजप प्रत्येक मतदानामध्ये अशा प्रकारचे अजेंडा सेट करता आणि त्यामधूनच जातीजातीमध्ये भेद वाढवण्यात आले आहेत; असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com