Sushma Andhare : अमित शाह यांच्याकडून सल्ला घ्यावा इतके वाईट दिवस 'मातोश्री'चे आले नाहीत, ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्याची तोफ धडाडली

Karad News : भाजपचे नेते केंद्राचे मंत्री अमित शाह आज प्रचारार्थ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कराड येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शाह यांच्यावर निशाणा साधला
Sushma Andhare
Sushma AndhareSaam tv
Published On

कराड : आम्ही काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याचे सल्ले अमित शहा यांच्याकडून घ्यावे; इतके वाईट दिवस ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीवर आले नाहीत. ठाकरे बाणा महाराष्ट्राला माहित आहे; अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.  

भाजपचे नेते केंद्राचे मंत्री अमित शाह आज प्रचारार्थ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. (Karad) कराड येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवरायांच्या पायाशी एकनाथ शिंदे यांनी खोटी शपथ घेतली, यावर अमित शहा यांच काय म्हणणं आहे असा सवाल देखील (Sushma Andhare) अंधारे यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरेंचे त्यांना आव्हान वाटतेय 

अमित शहा (Amit Shah) इतना झूठ बोलकर आपको नींद कैसे आती है. ज्यांनी ७० हजार कोटीचा घोटाळा केलाय, त्यांना चक्की पिसायला पाठवू म्हटले; त्यांना आपण जवळ घेऊन बसलात. जेवढ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना त्यांना जवळ घेतलं आहे. तरीही आनंद या गोष्टीचा आहे, की महाराष्ट्रात आल्यावर अमित शहा यांच्या भाषणाची सुरवात, मध्य आणि शेवट उद्धव ठाकरे यांच्या नावाने होतो. मोठं आव्हान त्यांना उद्धव ठाकरे वाटतात ही आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे.

Sushma Andhare
Lonavala Vidhan Sabha : आमदार सुनील शेळके यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा; प्रचार रॅलीदरम्यान समर्थकांमध्ये बाचाबाची

काय कामे केली हे वरिष्ठांकडून जाणून घ्या 

शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा भूकंपासारखी स्थिती होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना सारखी स्थिती हाताळली. केंद्रीय संरक्षण मंत्री असताना, कृषि मंत्री असताना त्यांनी काय काम केलं हे अमित शहा यांनी आपल्या वरीष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावे. शरद पवार यांच्या वाढदिवसाला भाजपचे नेते काय बोलत होते, ते ऐका आणि तुमची स्रिप्ट वाचणाऱ्या राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याबद्दल काय म्हटलंयं हे ही ऐका.

Sushma Andhare
Pankaja Munde : बंडखोरी हा राजकारणाचा एक भाग; पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

कोणीतरी नोटीस पाठवली म्हणून घाबरणारे आम्ही नाही. गेल्या अडीच- तीन वर्ष रोज असल्या केसेस आणि नोटीस याचा आम्ही सामना करत आहोत. नोटीस पाठवले म्हणून सुनील टिंगरे धुतल्या तांदळासारखे होतात का? धनंजय महाडिक, देवेद्र भुयार, रवी राणा, राम कदम यांच्या डोक्यात सत्तेचा माज आहे. त्यांना असं वाटतं त्यांनी आपली बापजाद्याची दौलत विकून इथल्या माय भगिनींना दौलतजादा केली आहे. पण त्याना माहिती असावं महाराष्ट्रातील लोकांच्या टॅक्समधून हें दिलं जातं; असेही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com