Om Bhutkar wedding: मराठमोळ्या अभिनेत्याने गुपचुप उरकलं लग्न?; बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Om Bhutkar: राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी अभिनेता ओम भुतकरने गुपचुप लग्न केलं आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Om Bhutkar wedding
Om Bhutkar weddingSaam Tv
Published On

Om Bhutkar: मराठी मनोरंजन विश्वातील अनेक प्रसिद्ध कलाकार लग्नबंधनात अडून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. नुकतचं अभिनेता निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांनी थाटामाटात लग्न केलं. आता आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी अभिनेता ओम भुतकरने गुपचुप लग्न करुन कलाकार मंडळींसह त्याच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

राजश्री मराठीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये फोटोंमध्ये ओम भुतकर लग्नाच्या पारंपरिक पोशाखात दिसत आहे. त्याच्यासोबत नव्या नवरीच्या सुंदर रुपात एक तरुणीही दिसते यावरुन त्यांनी लग्न केल्याचे दिसत असून राजश्री मकाठीने या पोस्ट खाली ओम भूतकरने बांधली लग्न गाठ नांदा सौख्य भरे असे लिहिले आहे. अनेकांनी अभिनेत्याने लग्न केल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परंतू त्याने कोणसोबत लग्न केले आहे हे अद्यप कळले नाही.

Om Bhutkar wedding
Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं

ओम भुतकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. आपल्या नैसर्गिक अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'रावरंभा', 'आता थांबायचं नाय', 'जिंदगी विराट', 'बारायण', मुळशी पॅटर्न', 'नाळ', 'नाळ २', तुंबाडची मंजुळा आणि इतर अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. विशेषतः त्याच्या सुखन या उर्दू गझल शायरीच्या कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय स्तरावर खास ओळख मिळाली.

Om Bhutkar wedding
Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

दरम्यान, ओम भुतकरच्या आगामी प्रकल्पांचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा हा अभिनेता पुढे कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, व्हायरल झालेल्या फोटोंमागचे सत्य काय, याबाबत ओम स्वतः कधी भाष्य करणार, अभिनेत्याने खरचं लग्न केल आहे का? याचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com