Kiran Mane On Jawan Movie: '...म्हनूनच त्यांनी 'जवान'ला ठरवून डोक्यावर घेतलं', चित्रपट पाहिल्यानंतर 'साताऱ्याच्या शाहरुख'नं मांडलं मत

Kiran Mane Post After Watch Jawan Movie: 'साताऱ्याचा शाहरुख' अर्थात मराठमोळा अभिनेता किरण माने यांनी नुकताच जवान चित्रपट पाहिला.
Kiran Mane On Jawan
Kiran Mane On JawanSaam Tv

Shah Rukh Khan Jawan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या (Actor Shah Rukh Khan) 'जवान'ची (Jawan Movie) सध्या सगळीकडेच हवा आहे. गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या जवानने बॉक्स ऑफिसवर (Box Office) अवघ्या चार दिवसांमध्येच बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते चित्रपटगृहामध्ये मोठी गर्दी करत आहेत.

फक्त चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील जवान पाहायला जात असून आपले मत व्यक्त करत आहेत. अशामध्ये आता 'साताऱ्याचा शाहरुख' अर्थात मराठमोळा अभिनेता किरण माने यांनी नुकताच जवान चित्रपट पाहिला. शाहरुख खानचा फॅन असलेल्या किरण माने यांनी चित्रपट पाहिल्यानंतर खास पोस्ट करत चित्रपटाबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

Kiran Mane On Jawan
Khalga Trailer: हृदयस्पर्शी कथा सांगणाऱ्या ‘खळगं’चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटातून वास्तविकता रुपेरी पडद्यावर मांडणार

किरण माने यांनी नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवान चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट करत या चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, ...'जवान'मध्ये शाहरूखच्या आवाजात एक सनसनीत शेर हाय, "उसूलों पे जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है... जो ज़िन्दा हों, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है !" ...हा शेर आजच्या परिस्थितीत लै लै लै मोलाचा संदेश देऊन जातो भावांनो. '

'जवा-जवा आपल्यावर दडपशाहीचं सावट येतं... आपल्या पूर्वजांनी झगडून, लढा देऊन मिळवलेलं, आपलं व्यक्त होन्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं... आपल्यावर पिढ्या न् पिढ्या असलेल्या मानवतेच्या, समानतेच्या, बंधुभावाच्या संस्कारांवर घाला घातला जातो... तवा बिनधास्त नडायला पायजे, भिडायला पायजे... 'टकराना ज़रूरी है' ! तोच आपल्या जिवंत असल्याचा पुरावा असतो. नायतर सगळं सहन करत, मुकाट जगनं मुडद्यापेक्षा बदतर असतं !', असं ते म्हणाले.

Kiran Mane On Jawan
AR Rahman Concert: हसत हसत गेले पण निराश होऊन परतले, ए आर रहमान यांच्या चेन्नईमधील कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

किरण माने यांनी पुढे असे लिहिले आहे की, '...शायरीच्या दुनियेत बेताज बाहशाह असलेल्या वसीम बरेलवींचा एक दिवस फोन वाजला, "हॅलो, वसीमजी, मी शाहरूख खान बोलतोय. तुमचा हा शेर मला कायम प्रेरणा देतो. यावेळी तो माझ्या सिनेमात वापरायला मला तुमची परवानगी हवीय." वसीमभाई म्हन्ले,"शाहरूख बेटा, तू मला आवडतोस. परवानगी देईन, पण एका अटीवर. हा शेर मी लिहून देईन, तसाच्या तसा सिनेमात तू तुझ्या आवाजात म्हणायचास." शाहरूखनं नम्रपणे हसून होकार दिला. दोन ओळींसाठी एवढा मोठ्ठा कलाकार स्वत: फोन करून विनयशीलतेनं परवानगी मागतो याचं बरेलवींना लैच नवल वाटलं.

Kiran Mane On Jawan
Riteish Deshmukh First Reaction: 'मला आणखी २-३ मुलं चालली असती, पण...',जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर रितेशची पहिली प्रतिक्रिया...

किरण माने यांनी सध्या चित्रपटसृष्टीतील खरी परिस्थिती देखील या पोस्टमध्ये सांगितली आहे. त्यांनी लिहिले की, '...खरंतर ज्यांना शाहरूखचं अफाट वाचन, तिक्ष्ण बुद्धीमत्ता, विवेकी विचारसरणी, समाजभान याविषयी माहिती आहे, त्यांना या गोष्टीचं लै नवल वाटनार नाय. असे कलावंतच न डरता, मागे न हटता, पाठीचा कणा ताठ ठेवून जगतात. नायतर बाकी आज आपल्या सिनेमाक्षेत्रात बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत वो.'

Kiran Mane On Jawan
Mitali Mayekar Birthday: '...दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही', मिताली मयेकरच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बाबांची खास पोस्ट

तसंच,'फायद्यासाठी व्यवस्थेचे पाय चाटत लाचार जगनार्‍या... जातीधर्मांत द्वेषाचं विष पसरेल असा इतिहासाचा विपर्यास करनारे सिनेमे काढनार्‍या... भ्रष्ट नेत्यांकडून फंडिंग उकळत प्रोपोगंडा फिल्मस् काढनार्‍या सुमार दर्जाच्या कलाकारांची मराठी-हिंदीत सद्दी आहे. अशा नट-दिग्दर्शकांची ठरवून 'हाईप' केली जाते. पात्रता नसताना अनेक सरकारी पुरस्कार, पदं देऊन प्रेक्षकांवर लादलं जातं. हे पाहून कवा-कवा निराशा यायची. अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा...', असे ते म्हणाले.

यावेळी किरण माने यांनी प्रेक्षकांचे कौतुक केले आहे. त्यांनी असे लिहिले की,'पन प्रेक्षक येडे नसतात. पितळ आनि सोनं, काच आनि हिरा यातला फरक कळतो त्यांना... म्हनूनच त्यांनी 'जवान'ला ठरवून डोक्यावर घेतलं. शाहरूख खान नांवाच्या अस्सल भारतीय कलावंताला भरभरून प्रेम देऊन प्रेक्षकांनी हे दाखवून दिलं की, बास झालं आता. आम्हाला मूर्ख समजू नका... 'हम ज़िन्दा है... और ज़िन्दा नज़र आना चाहते है !', असं म्हणत या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी प्रेक्षकांसोबत शाहरुख खानचे देखील कौतुक केलं आहे.

Kiran Mane On Jawan
Ira Khan Video: 'आत्महत्येचा विचार येत असेल तर...' ड्रिप्रेशनमध्ये असलेल्यांना आयरा खानने दिला सल्ला, VIDEO होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com