Mitali Mayekar Birthday: '...दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही', मिताली मयेकरच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बाबांची खास पोस्ट

Mitali Mayekar Birthday Special News: आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त मिताली मयेकरच्या वडिलांनी तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
Mitali Mayekar Birthday
Mitali Mayekar BirthdaySaam tv

Mitali Mayekar Father Post:

नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरचा (Actress Mitali Mayekar) आज वाढदिवस आहे. मिताली आज तिचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मिताली आपल्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन करण्यासाठी नवरा सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) दुबईला गेली आहे. वाढदिवसानिमित्त मितालीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशामध्ये आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त मिताली मयेकरच्या वडिलांनी तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Mitali Mayekar Birthday
Jawan 4th Day Collection: ‘जवान’ने पहिल्याच विकेंडला रचला इतिहास, रविवारी कमाईच्या आकड्याने गाठला उच्चांक

मिताली मयेकरच्या वडिलांनी तिला वाढदिसाच्या शुभेच्छा देत पाठवलेला खास मेसेज अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. वडिलांचा खास मेसेज शेअर करत मितालीने या पोस्टमध्ये माझ्या वडिलांनी माझ्यासाठी हा मेसेज पाठवून माझा संपूर्ण दिवस खास केला असल्याचे म्हटले आहे. मितालीच्या वडिलांनी आपल्या लेकीसाठी केलेल्या या मेसेजमध्ये २७ वर्षांपूर्वीच्या आठवणींना म्हणजेच मितालीच्या जन्मावेळीच्या क्षणांना उजाळा दिला आहे. वडिलांचा हा भावुक मेसेज पाहून मिताली मयेकर देखील भावुक झाली आहे.

Mitali Mayekar Father Post
Mitali Mayekar Father PostSaam tv
Mitali Mayekar Birthday
Kareena Kapoor Video: 'अगं बाई सावधान राहायचं असतं...' करीना कपूर राष्ट्रगीताला उभी राहिली अन् ट्रोल झाली

मितालीच्या वडिलांनी असे लिहिले आहे की, '२७ वर्षांपूर्वी साधारण या वेळेला आम्हाला कळलं होतं की, उद्या दुपारपर्यंत आमचा बाबू आमच्या हातात असेल. कोण असेल, कसा असेल ह्याचं प्रचंड टेन्शन होतं. पण जे काही असेल कसंही असेल पण आपले बाळ असेल ह्यातच सगळा आनंद होता. पण आम्हाला दोघांनाही जे मनापासून हवं होतं तेच परमेश्वराने आम्हाला दिलं.'

Mitali Mayekar Birthday
Prabhas New Project: रामानंतर आता बाहुबली दिसणार शंकराच्या भूमिकेत; प्रभासने केला खुलासा

त्यांनी पुढे असे लिहिले की, 'सकाळी विषय झाला तेव्हा आई म्हणाली, २७ वर्षांपूर्वी पोटातलं जग बघत होती आता सगळ्या जगभर फिरतेय! असाच खूप खूप मोठा हो! यशस्वी हो! उद्या तुझा २७वा वाढदिवस! दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही. तुझ्याशी बोबडं बोलण्याची सवय अजूनही गेली नाही आमची! तुझ्या लहानपणीच्या आठवणी आल्या नाहीत असा एकही दिवस जात नाही. मग तुझे ते बोबडे बोल आम्हीच एकमेकांशी बोलतो. तू मोठी झालीस पण आम्ही अजूनही त्याच जगात वावरतोय. कारण तू आमच्यासाठी अजूनही तीच आहेस तशीच आहेस. छकुली! वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा पिलू! आणि खूप खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद!'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com