Ira Khan Video: 'आत्महत्येचा विचार येत असेल तर...' ड्रिप्रेशनमध्ये असलेल्यांना आयरा खानने दिला सल्ला, VIDEO होतोय व्हायरल

Ira Khan Spoke About Depression: काही महिन्यांपूर्वी आयराने ती डिप्रेशनची शिकार झाल्याचे सांगितले होते. पण आता ती डिप्रेशनमधून बाहेर आली असून आनंदी आहे.
Ira Khan Spoke About Depression
Ira Khan Spoke About DepressionSaam tv

Amir Khan Daughter Ira Khan Video:

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट'आमिर खानची (Actor Amir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आयरा कधी तिच्या लव्ह लाइफमुळे, तर कधी पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. बऱ्याचदा दी आपल्या आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे बोलताना दिसते. काही महिन्यांपूर्वी आयराने ती डिप्रेशनची शिकार झाल्याचे सांगितले होते.

डिप्रेशनच्या काळामध्ये ती अनेक तास रडत राहिली आणि उपाशी राहिली होती, असे तिने सांगितले होते. पण डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर आयरा सध्या आनंदी आयुष्या जगत आहे. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून आयरा चर्चेत आली आहे. आयराने यावेळी डिप्रेशनमध्ये असलेल्यांना सल्ला दिला आहे. यासंदर्भातला तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ira Khan Spoke About Depression
Mitali Mayekar Birthday: '...दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही', मिताली मयेकरच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बाबांची खास पोस्ट

आयराने 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२३' संदर्भात लोकांना एक व्हिडिओ संदेश दिला आहे जो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या संदेशात आयराने लोकांना नैराश्याशी लढण्यासाठी प्रेरित केले. तिने दिलेला सल्ला हा डिप्रेशनमध्ये असलेल्या अनेकांच्या फायद्याचा आहे. या व्हिडिओमध्ये आयराने डिप्रेशनसारख्या धोकादायक आजाराविषयी खुलेपणाने सांगितले आणि लोकांना त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरित केले.

Ira Khan Spoke About Depression
Riteish Deshmukh First Reaction: 'मला आणखी २-३ मुलं चालली असती, पण...',जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर रितेशची पहिली प्रतिक्रिया...

आयरा खानने व्हिडिओमध्ये सांगितले की, 'आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे, म्हणजेच या दिवशी तुम्ही लोकांना आत्महत्येपासून वाचवू शकता. कोणाच्या मनात आत्महत्येचा विचार आला तर त्याला खूप भीती वाटते. हा विचार इतका भयानक आहे की ते कोणालाही सांगण्यास घाबरतात. या विषयावर बोलले तर आत्महत्येचे असे विचार मनात येऊ लागतील, असे अनेकांना वाटते. पण तसं नाही. तुम्हाला त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही. त्यापेक्षा मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे.' आयराचा हा सल्ला अनेकांसाठी खूपच फायदेशीर आहे.

दरम्यान, आयरा खान सध्या तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत राहते. तिने काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली होती. सोशल मीडियावर सक्रीय असणारे आयरा आणि नुपूर नेहमी आपले प्रेम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. नूपुर व्यवसायाने जिम ट्रेनर आहे. आयरा अनेकदा सोशल मीडियावर नुपूरसोबतचे खासगी फोटो शेअर करत असते. हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे.

Ira Khan Spoke About Depression
AR Rahman Concert: हसत हसत गेले पण निराश होऊन परतले, ए आर रहमान यांच्या चेन्नईमधील कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com