Riteish Deshmukh First Reaction: 'मला आणखी २-३ मुलं चालली असती, पण...',जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर रितेशची पहिली प्रतिक्रिया...

Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy Rumors : व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy Rumors
Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy RumorsSaam TV

Genelia Deshmukh Pregnancy Rumors:

बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वांच्या आवडतं आणि क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh). हे कपल प्रेक्षकांना फक्त ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन देखील खूप आवडते. हे कपल नेहमी चाहत्यांचे मन जिंकत असते. नुकताच एका कार्यक्रमात रितेश आणि जेनेलिया यांनी एकत्र हजेरी लावली. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नेंट (Genelia Deshmukh Pregnancy) असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशामध्ये आता रितेश देशमुखने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy Rumors
Mitali Mayekar Birthday: '...दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही', मिताली मयेकरच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बाबांची खास पोस्ट

नुकताच रितेश देशमुखने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. रितेशने जेनेलिया प्रेग्नेंट असल्याबाबत जी बातमी व्हायरल होत आहे ती या पोस्टमध्ये शेअर करत त्यावर कमेंट केली आहे. यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, 'मला आणखी २-३ मुलं चालली असती. पण दुर्दैवाने हे असत्य आहे.' या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून रितेश देशमुखने जेनेलियाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीबाबत होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिले आहे. त्यामुळे जेनेलिया ही प्रेग्नेंट नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy Rumors
Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy RumorsSaam tv
Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy Rumors
Animal Teaser Release Date: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’च्या टीझरविषयी मोठी अपडेट, अभिनेत्याच्या वाढदिवशी होणार रिलीज?

शनिवारी रितेश आणि जेनेलिया एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी दोघेही खूपच क्यूट दिसत होते. रितेशने निळ्या रंगाच्या पँटसह पांढऱ्या रंगाचे शर्ट अशी ड्रेसिंग केली होती. तर जेनेलियाने जांभळ्या रंगाचा डीप नेक शॉर्ट वनपीस घातला होता. त्यावर तिने गोल्डन कानातले आणि गोल्डन हिल्सने तिने आपला लूक परिपूर्ण केला होता. जेनेलियाने केस मोकळे सोडले होते. या लूकमध्ये जेनेलिया इतकी सुंदर दिसत होती की सर्वांच्या नजरा तिच्याकडेच होत्या.

Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy Rumors
Jawan 4th Day Collection: ‘जवान’ने पहिल्याच विकेंडला रचला इतिहास, रविवारी कमाईच्या आकड्याने गाठला उच्चांक

या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या जेनेलिया आणि रितेशचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून कॅमेऱ्यासमोज पोज देताना दिसत आहेत. याचदरम्यान जेनेलिया तिच्या पोटावर हात ठेवून पोज देताना दिसली. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी तिला प्रेग्नेंट आहेस का? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. या व्हिडिओनंतरच जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले. पण आता रितेशने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिले.

Riteish Deshmukh On Genelia Deshmukh Pregnancy Rumors
Prabhas New Project: रामानंतर आता बाहुबली दिसणार शंकराच्या भूमिकेत; प्रभासने केला खुलासा

दरम्यान, रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केले होते. दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१४ मध्ये जेनेलियाने पहिला मुलगा रियानला जन्म दिला. त्यानंतर २०१६ मध्ये तिने दुसरा मुलगा राहिलला जन्म दिला. जेनेलिया आणि रितेश सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. दोघेही आपल्या अकाऊंटवरून कॉमेडी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. दोघांची बॉन्डिंग आणि प्रेम सर्वांना प्रचंड आवडते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com