सध्या मराठी चित्रपटांच्या कथेची आणि आशयघन कथानकाची सर्वत्र बरीच चर्चा होत आहे. चित्रपटाचे कथानक, बोलीभाषेतले संवाद, कलाकाराचा अभिनय इत्यादी अशा अनेक गोष्टींच्या आधारे, सध्याचा प्रेक्षकवर्ग चित्रपट पाहावा की नाही हे ठरवतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एका आशयघन कथानकाची आणि उत्तम कथा असलेल्या हृदयस्पर्शी ट्रेलरची चर्चा होतेय. थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणाऱ्या आणि सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणाऱ्या ‘खळगं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटाच्या कथानकाची प्रचंड चर्चा होतेय. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला नवोदित कलाकार येणार आहेत. ट्रेलर झालेल्या कथेमध्ये, पोलीस होण्याची उमेद, उराशी बाळगलेलं स्वप्न एका आई लेकाची सुरू असलेली धडपड, एकीकडे प्रेमासाठीचा त्याग या सर्व गोष्टी आपल्याला ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. नवोदित कलाकारांनी केलेला अभिनय हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. गावखेड्यातील आणि सत्यघटनेवर आधारित ‘खळगं’ या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे. (Actors)
अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथा सांगणाऱ्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी घेतली. ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’ प्रस्तुत चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’सह गोवर्धन दोलताडे, सुरेश तांदळे, रोहन पाटील यांनी निर्मातीची बाजू सांभाळली आहे. तर सहनिर्माते म्हणून लिला डेव्हलपमेंट, अनुराधा किसनराव नजनपाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद शिवाजी दोलताडे, गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सचिन अवघडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे. (Marathi Film)
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत माधवी जुवेकर, कार्तिक दोलताडे, सुलतान शिकलगार, रोशनी कदम, प्रज्वल भोसले, प्रितम भंडारे, कल्यानी पवार, शिवाजी दोलताडे, माणिक काळे, वैष्णवी मुरकुटे, ज्वालामुखी काळे, भैरव जाधव, संकेत कवडे, शिल्पा कवडे, मयूर झिंजे, मोहन घोलप, मंगेश ससाणे, ऐश्वर्या लंगे, गणेश शिंदे, शरद पवार हे कलाकार आहेत. नवोदित अभिनेत्यांनी या चित्रपटात अभिनय केला असून चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. येत्या २२ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.