Rahul Deshpande Purchased New Car: गायक राहुल देशपांडे यांनी खरेदी केली आलिशान कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाले - '... खूप अभिमान वाटत आहे'

Rahul Deshpande News: नुकतेच गायक राहुल देशपांडे यांनी नवीन अलिशान कार खरेदी केली आहे.
Rahul Deshpande Purchased New Car
Rahul Deshpande Purchased New CarInstagram

Rahul Deshpande Purchased New Car

सध्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारमंडळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी श्रावण महिन्याचा योग साधत नवीन घर आणि नवीन कार खरेदी केली आहे. सध्या सोशल मीडियावर शास्त्रीय गायक आणि अभिनेते राहुल देशपांडे बरेच चर्चेत आहेत. नुकतंच त्यांनी नवीन अलिशान कार खरेदी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. कायमच आपल्या शास्त्रीय गाण्यांमुळे चर्चेत राहणारे गायक राहुल देशपांडे यांनी नवीन अलिशान कार खरेदी केली आहे.

Rahul Deshpande Purchased New Car
Riteish Deshmukh First Reaction: 'मला आणखी २-३ मुलं चालली असती, पण...',जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर रितेशची पहिली प्रतिक्रिया...

राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल देशपांडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमीच ते चाहत्यांसोबत सोशल मीडियावर आपल्या गाण्यांविषयी, आगामी प्रोजेक्टविषयी माहिती शेअर करत असतात. सोबतच आपल्या चाहत्यांसोबत, अनेकदा ते आपल्या मुलीसोबतच्याही व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतंच राहुल देशपांडे यांनी नवीन कोरी मर्सिडीज बेन्झ कार खरेदी केली आहे. यावेळी त्यांनी कार खरेदी करत असताना, त्यांच्या परिवारातील सर्वच सदस्य उपस्थित होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राहुल देशपांडे यांनी खास त्यांच्या आई- वडीलांसाठी एक खास संदेश दिलाय. (Singer)

Rahul Deshpande Purchased New Car
Animal Teaser Release Date: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’च्या टीझरविषयी मोठी अपडेट, अभिनेत्याच्या वाढदिवशी होणार रिलीज?

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना गायक राहुल देशपांडे म्हणतात, आई बापू, तुम्ही कायम आमच्यासोबत उभे आहेत. आज तुमच्या मुळेच मी एक चांगल्या हुद्द्यावर आहे. एका क्षणात माझ्या डोळ्यासमोरुन सर्व जुन्या आठवणी गेल्या. बापू तुम्ही मला नेहमीच तुमच्या स्कुटरवरुन संगीताच्या क्लासला घेऊन जायचे. आणि त्याच स्कुटरवर आपण चौघेही फिरायला जायचो. बापू आणि आई, तुम्ही माझ्यावर कायमच चांगले संस्कार केल्याबद्दल आणि मला मोठ्यांचा आदर करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद. मला खूप अभिमान वाटतो की मी, नेहा आणि रेणुका तुला या ड्रीम कारमध्ये बसलेलं पाहून खूप अभिमान वाटतोय. तुमच्या दोघींसाठी मी नक्कीच सर्वांसाठी जग जिंकेन.” राहुल देशपांडे यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. (Actors)

राहुल देशपांडे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत जाऊन त्यांनी शोरूममध्ये आपल्या गाडीचा ताबा मिळवला. यावेळी राहुल देशपांडे यांच्या नव्या गाडीची पूजा त्यांची लेक रेणुकाने केली. तर या व्हिडीओमध्ये राहुल देशपांडे यांनी पहिल्यांदाच त्यांच्या वडिलांना या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवलेलं दिसून येत आहे. या पोस्टवर राहुल यांच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही त्यांच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर, अमेय वाघ, सुबोध भावे, निपुण धर्माधिकारी, उमेश कामत, आदिनाथ कोठारे, प्रियंका बर्वे, रेणुका शहाणेंसह अनेक सेलिब्रिटींनी आणि गायकांनी त्यांच्या पोस्टवर अभिनंदानाचा वर्षाव केला आहे. (Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com