International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

International Film Festival Award: दिल्लीतील आंतरराष्ट्रीय आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका मराठमोळ्या युवा कलाकाराने एका हिंदी फिल्मसाठी बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड मिळवत मराठीचा झेंडा राजधानीत फडकावला
International Film Festival Award
International Film Festival AwardSaam Tv
Published On

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका मराठमोळ्या युवा कलाकाराने एका हिंदी फिल्मसाठी बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड मिळवत मराठीचा झेंडा राजधानीत फडकावला. श्रीजा बरुआ दिग्दर्शित द मशरूमस या फिल्ममधील अभिनयासाठी अभिजीत नलावडे या युवा अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अनुष्का कौशिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. (Entertainment News In Marathi)

राजधानी दिल्ली येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये द मशरूम या फिल्मचा वर्ल्ड प्रीमियर शो मोठया उत्साहात पार पडला. मूळचा महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या कर्जतचा असलेल्या अभिजीत ने मुंबईत हिंदी नाटकांमध्ये आपला वावर ठेवला आहे.

फेस्टिव्हलमध्ये अभिजीत नलावडे आणि अभिनेत्री अनुष्का कौशिक या जोडीच्या अभिनयाला उपस्थित दर्दी प्रेमींनी चांगलीच दाद दिली. तब्बल 600 फिल्मसमधून मशरूम या फेस्टिव्हलमध्ये सिलेक्ट झाली होती. महोत्सवातील परीक्षकांनिही या फिल्मचे आणि कलाकारांचे भरभरून कौतुक केले.

विशेषता स्क्रीनिंग नंतर या जोडीची फेस्टिवलमध्ये खास मुलाखतही घेण्यात आली. मशरूम च्या टीमने आणखी एक गुड न्यूज दिली, ती म्हणजे USA FILM FESTIVAL या अमेरिकन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही या फिल्मची निवड करण्यात आली आहे. एकूणच दिल्लीतील या आरवली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उत्साही प्रतिसादाने कलाकारही भारावून गेलेले दिसले. आनंदित झालेले दिसले.

मुंबईतून आलेल्या अभिजीत नलावडे या कलाकाराची ही पहिलीच फिल्म असूनही त्याच्या पडद्यावरील संयमित अभिनयाला परीक्षकांची चांगलीच दाद मिळाली. तर महाराणी, लस्ट स्टोरीज 2, पटना शुक्ला, उजडा चमन अशा अनेक वेब सिरीज मधून झळकलेली अनुष्का कौशिक दि मशरूमस मध्ये एका वेगळ्याच retro लूक मध्ये दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com