Alibaba Aani Chalishitale Chor: 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' लवकरच येणार भेटीला, नेमकं आहे तरी काय?

Umesh Kamat, Mukta Barve, Shruti Marathe, Subodh Bhave: 'अलीबाबा आणि चाळीस चोर' ही गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून तुम्हाला नवल वाटले असे ना? तर ही काही गोष्ट नसून हा नवीन चित्रपट आहे जो लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.
Alibaba Aani Chalishitale Chor Movie
Alibaba Aani Chalishitale Chor MovieSaam Tv
Published On

Alibaba Aani Chalishitale Chor Movie:

मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची खास मेजवाणी असणार आहे. त्यांच्या भेटीला एक नव्या धाटणीचा चित्रपट येत आहे. 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' (Alibaba Aani Chalishitale Chor Movie) असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve), उमेश कामत (Umesh Kamat) आणि श्रृती मराठे (Shruti Marathe) हे कलाकार तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

'अलीबाबा आणि चाळीस चोर' ही गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून तुम्हाला नवल वाटले असे ना? तर ही काही गोष्ट नसून हा नवीन चित्रपट आहे जो लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २९ मार्चला पोट धरून हसण्यासाठी तयार राहा. या चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे. तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Alibaba Aani Chalishitale Chor Movie
Shaitaan Trailer: अजय देवगणच्या 'शैतान'चा खरतनाक ट्रेलर रिलीज, पाहून अंगावर येईल काटा

या चित्रपटाचे नाव खूपच जबरदस्त आणि उत्सुकता वाढवणारे आहे. विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे गुन्हा आहे का? आणि हे नेमके काय प्रकरण आहे? तुम्हाला पडलेल्या या प्रश्नांची उत्तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच म्हणजे २९ मार्चला मिळतील. नुकताच रिलीज झालेल्या टीझरच्या माध्यमातून या चित्रपटातील कलाकारांची ओळख करून देण्यात आली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितले की, 'विवाहीत असण्याचा गुन्हा या चाळीशीतील चोरांनी केला आहे. आता या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळणार हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट विनोदी आहे. सगळेच कलाकार मातब्बर असल्याने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.'

Alibaba Aani Chalishitale Chor Movie
Gharoghari Matichya Chuli: रेश्मा शिंदेची 'घरोघरी मातीच्या चुली'ची चर्चा, २० वर्षे जुन्या हिंदी मालिकेचा आहे रिमेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com