Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

Mamachya Govyala Jauya Trailer: 'मामाच्या गोव्याला जाऊया' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अंकुश चौधरींचा डॉन अवतार, कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेली गोव्याची भन्नाट सफर पाहायला मिळणार आहे.
Mamachya Govyala Jauya Trailer
Mamachya Govyala Jauya TrailerSaam Tv
Published On

Mamachya Govyala Jauya Trailer: मराठी सिनेसृष्टीतील बहुप्रतीक्षित 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या टीझरमधून संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांच्या लाडक्या मामाची गोवा ट्रिप पाहायला मिळाली होती. मात्र, आता ट्रेलरमध्ये कॉमेडीसोबतच अॅक्शन, सस्पेन्स आणि थराराचीही जबरदस्त मेजवानी पाहायला मिळत आहे.

ट्रेलरची सुरुवात गोव्याच्या मजेशीर सहलीने होते. संत्या, बाबा, कुश्या आणि मामा यांच्यातील धमाल केमिस्ट्री, विनोदी प्रसंग आणि सतत निर्माण होणारे गोंधळ प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. मात्र, कथेला अचानक अनपेक्षित वळण मिळते आणि अंकुश चौधरी यांनी साकारलेला साधा, भोळाभाबडा मामा एका क्षणात डॉनच्या अवतारात समोर येतो. ट्रेलरच्या शेवटी दिसणारा हा अवतार प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. मामा खरोखरच डॉन आहे की त्यामागे आणखी काही रहस्य दडले आहे, याची उत्सुकता आता वाढली आहे.

Mamachya Govyala Jauya Trailer
Atul Kulkarni: 'आजच्या परिस्थितीला आम्हीच जबाबदार'; जेन झीच्या आंदोलनाला प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा पाठिंबा

ट्रेलरमध्ये गोव्याच्या सुंदर पार्श्वभूमीवर पाठलाग, अॅक्शन, सस्पेन्स आणि कॉमेडीचा सुरेख संगम पाहायला मिळतो. प्रत्येक प्रसंगानंतर कथा नवे वळण घेते, त्यामुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम राहते. मैत्री, विनोद आणि रहस्य यांचा उत्तम मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.

Mamachya Govyala Jauya Trailer
Acterss Death: ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वात हळहळ

चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण यांची भन्नाट केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. त्यांच्या संवादफेकीपासून ते कॉमिक टायमिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना खळखळून हसवणारी आहे. याशिवाय महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्या दमदार भूमिका चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतात. तसेच नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांचाही आकर्षक अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले की, 'स्ट्रगलर साला'मधील संत्या, बाबा आणि कुश्या या पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता त्यांच्या आयुष्यात मामा येतो आणि त्यानंतर सुरू होणारा प्रवास अधिक मजेशीर, थरारक आणि अनपेक्षित बनतो. प्रत्येक पात्राची स्वतःची खास शैली असून, प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना हसवतानाच पुढे काय होईल, याची उत्सुकता कायम ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'विजुमेनिया प्रा. लि.' आणि 'लाईट अँड शेड' प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांनी लिहिले आहेत. ३१ जुलैपासून हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, गोव्याच्या पार्श्वभूमीवरची ही धमाल सफर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com