Atul Kulkarni: 'आजच्या परिस्थितीला आम्हीच जबाबदार'; जेन झीच्या आंदोलनाला प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा पाठिंबा

Atul Kulkarni: नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा पाठिंबा. सोशल मीडियावरील त्यांच्या भावूक पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.
Atul Kulkarni
Atul KulkarniSaam Tv
Published On

Atul Kulkarni: नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारांविरोधात नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि कलाकार या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका मांडणारे अतुल कुलकर्णी यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने आजच्या तरुण पिढीचे कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ह्या आंदोलनाच्या निमित्तानं...
आजच्या ह्या पिढीनं गांधी, आंबेडकरांना पुनरुज्जीवित केलंय.माझ्या आणि माझ्या अलिकडच्या, पलीकडच्या पिढ्यांनी सतत त्यांची नावं घेतली पण आमच्या आचरणात मात्रं आम्ही त्यांच्या विचारधारा जवळ, जवळ मृतवत करून टाकल्या होत्या. शैक्षणिक, सामाजिक, अर्थिक, पर्यावरणीय; सगळ्याच बाबतीत.आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत आहोत. आता जागे होऊन, जबाबदारी स्वीकारून, ह्या तरूणांना पाठिंबा देणं इतकं तरी आम्ही करायलाच हवं

Atul Kulkarni
Acterss Death: ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वात हळहळ

याआधीही अतुल कुलकर्णी यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक भावनिक हिंदी कविता पोस्ट केली होती. या कवितेत त्यांनी पोलिस कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि व्यवस्थेला थेट प्रश्न विचारत आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या वेदना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच नागरिकांनी या आंदोलनाशी जोडले जावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.

Atul Kulkarni
Saudi Prince dead: आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा मृत्यू; पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक कारण उघड

दरम्यान, सीजेपीकडून सुरू असलेल्या या आंदोलनात NEET पेपरफुटी, विविध परीक्षांमधील पारदर्शकतेचा अभाव आणि कथित गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com