प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे लग्न बंधनात अडकला.
गौरव मोरेने आपल्या गर्लफ्रेंडसोबत नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे.
गौरव मोरे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला.
मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कॉमेडी किंग गौरव मोरेने गूपचूप लग्नगाठ बांधली आहे. त्याचा बायकोसोबतचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. गौरव मोरे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला आहे. त्याने आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. गौरव मोरेला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखले जाते.
मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने इन्स्टाग्राम गौरव आणि त्याच्या बायकोसोबत स्टोरी शेअर केली आहे. फोटोमध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत. गौरव मोरेच्या बायकोचे नाव प्रियांका कारेकर आहे. गौरव आणि प्रियांका अनेक वेळापासून एकमेकांना डेट करत होते. ते अनेक वेळा एकत्र स्पॉट देखील झाले आहेत. गौरव मोरेने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली आहे. ऋतुजाने फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे गौरव मोरेचे लग्न झाल्याचे स्पष्ट होते. मात्र अद्याप गौरवने कोणताही अधिकृत माहिती दिली नाही.
ऋतुजा बागवे फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मिस्टर अँड मिसेस मोरे तुमच्या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे अभिनंदन! तुम्हाला आयुष्यभर प्रेम, आनंद आणि सुख लाभो, हीच सदिच्छा... करू आणि बच्ची गॉड ब्लेस यू..." फोटोमध्ये गौरव मोरेने चंदेरी रंगाचा सुंदर कुर्ता परिधान केला आहे. तर प्रियांकाने कॉफी कलरची सुंदर साडी नेसली आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा दिसत आहे. तर हाताला तिने मेहंदी देखील लावली आहे.
चाहते आणि कलाकार मंडळी गौरव आणि प्रियांकाला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. गौरव मोरेने मराठी चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. यामध्ये 'बॉईज २', 'अल्याड पल्याड' आणि 'लंडन मिसाळ' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.