'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुन्हा एकदा काव्या-पार्थचे नातं खुलताना दिसत आहे.
तर जीवा-नंदिनी घटस्फोट घेणार आहे.
जीवा नंदिनीला घटस्फोटाची नोटीस पाठवतो.
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेमध्ये जीवा-काव्याचा भूतकाळ सर्वांसमोर आल्यावर जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या नात्यात दुरावा येतो. त्यानंतर पार्थचे प्रेम मिळवण्यासाठी काव्या पार्थच्या घरी राहायला येते. पार्थ काव्याचा भूतकाळ जाणून घेतो. त्यांच्यात पुन्हा मैत्री आणि प्रेमाचे नातं फुलताना दिसते. तर दुसरीकडे नंदिनीचे प्रेम मिळवण्यासाठी जीवा नंदिनीच्या घराबाहेर रिक्षामध्ये राहायला लागतो. मात्र त्यांच्या नात्यात गैरसमजामुळे फूट पडताना दिसते.
नंदिनी कळतनकळत जीवाला दुखावते. त्यामुळे आता जिवाची समजूत काढण्यासाठी आणि आपले प्रेम मिळवण्यासाठी नंदिनी जिवाच्या घरी राहायला जाते. नंदिनी जीवाच्या खोली बाहेर बसून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यातही तिला अपयश येते. नुकताच 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा एक धक्कादायक प्रोमो समोर आला आहे. ज्यात जीवा नंदिनीला घटस्फोट देताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जीवा नंदिनीला 'फास्ट ट्रॅक' डिव्होर्स पेपर्स देतो. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करून तो नंदिनीला देतो. म्हणतो की, "लग्नानंतर प्रेम नाही Divorce होतो..." जीवाचे हे रूप पाहून नंदिनीला मोठा धक्का बसतो. आता खरंच जीवा नंदिनीचा घटस्फोट होणार? जीवा-नंदिनीचे नातं तुटणार? की नंदिनी जीवाचे प्रेम आणि विश्वास पुन्हा जिंकणार हे सर्वच पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "घटस्फोटाचा हा कागद कोणतं नवं वळण देईल जीवांदिनीच्या नात्याला?" 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिकेचा हा विशेष भाग 9 आणि 10 फेब्रुवारी संध्याकाळी 7:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. त्यामुळे 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचे येणार भाग खूपच महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.