प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाला सिगारेटचा चटका
अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
अभिनेत्रीची हिऱ्याची अंगठी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला
'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्री अपरा मेहता यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिका टिव्ही मनोरंजन विश्वातील गाजलेली मालिका आहे. या मालिकेत 'सविता विरानी'ची भूमिका अपरा मेहता यांनी साकारली होती.
अलिकडेच एका मिडिया मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, एकदा अतिउत्साही चाहत्यांनी त्यांना सिगारेटने भाजले आणि त्यांच्या बोटातील हिऱ्याची अंगठी ओढून काढण्याचाही प्रयत्न केला होता.
hauterrfly शी बोलताना, अपरा मेहता यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी'च्या सुवर्णकाळात कोलकाता येथे एका गुजराती नाटकाच्या प्रयोगादरम्यान मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाच्या आठवणींना उजाळा दिला. त्या घटनेची आठवण सांगताना अपरा म्हणाल्या, "जेव्हा 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेची लोकप्रियता वाढली होती, तेव्हा मी कोलकातामध्ये एका गुजराती नाटकाचा प्रयोग करत होते. आम्ही 'कला मंदिर'मध्ये पाच प्रयोग केले आणि प्रत्येक प्रयोगाला थिएटर खच्चून भरलेले होते. मी आत प्रवेश करताच, लोकांनी मला पूर्णपणे वेढून टाकले..."
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, "त्यांनी मला मंचावर ओढले. लोक मला चहूबाजूंनी ओढत आणि ढकलत होते. जेव्हा मी त्यांच्याशी हात मिळवू लागले, तेव्हा एकाने माझ्या बोटातील हिऱ्याची अंगठी काढण्याचा प्रयत्न केला आणि एकाने चुकून मला सिगारेटने भाजले...संपूर्ण मंच हलू लागला. लोक बेभान झाले होते. परिस्थिती खूप धोकादायक बनली होती. मग त्यांनी मला मंचावरून खाली उतरण्यास सांगितले. त्यांनी माझ्याभोवती वर्तुळ तयार केले आणि त्यावेळी प्रत्येकजण मला सर्व बाजूंनी स्पर्श करत होता. मी म्हणाले, 'ठीक आहे, मला स्पर्श करा, पण तुम्हाला काय मिळणार आहे?'"
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.