'खतरों के खिलाडी १५' चा ग्रँड फिनाले झाला
टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता ठरला विजेता
ट्रॉफीसोबत अनेक बक्षिसे मिळाली
लोकप्रिय रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी १५' चा अखेर ग्रँड फिनाले काल (४ ऑक्टोबर २०२६) ला थाटामाटात पार पडला आहे. यंदा सीझनमध्ये टिव्ही विश्वातील मोठे चेहरे पाहायला मिळाले. या सीझनमध्ये 'बिग बॉस १९'चा विजेता गौरव खन्ना आणि उपविजेती फरहाना भट्ट देखील सहभागी होती. या सीझनमध्ये कोणी बाजी मारली जाणून घेऊयात.
'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर अभिनेता अविनाश मिश्राने नाव कोरले आहे. 'खतरों के खिलाडी १५' चे होस्टिंग 'ॲक्शन किंग' रोहित शेट्टीने केले. शोचे प्रथम उपविजेते पद ऋत्विक धनजानी आणि दुसरे उपविजेते ओरहान अवत्रामणी (ओरी) यांनी पटकावले आहे. चाहते आणि सर्व कलाकार मंडळी विजेत्यांचे अभिनंदन करताना , शुभेच्छा देताना दिसत आहेत.
'खतरों के खिलाडी १५' चे शूटिंग केप टाउन, दक्षिण आफ्रिकामध्ये झाले. यंदा 'चॅम्पियन्स विरुद्ध चॅलेंजर्स' हे रोमांचक स्वरूप पाहायला मिळाले. यापर्वात अनेक थरारक स्टंट्स पाहायला मिळाले. अविनाशची प्रबळ इच्छाशक्ती आणि स्टंट्समधील उत्कृष्ट कौशल्य यामुळे तो 'खतरों के खिलाडी १५' विजेता ठरला आहे. रोहित शेट्टी यांनी अविनाशचे नाव विजेता म्हणून जाहीर करताच, त्याला आनंदाश्रू अनावर झाले.
'खतरों के खिलाडी १५' च्या विजेत्या अविनाश मिश्राला चमकदार ट्रॉफीसोबत 20 लाखांचे रोख बक्षीस, एक नवीन कार आणि युरोपची ट्रिप बक्षिस म्हणून मिळाली आहे. सर्वत्र अविनाशचे कौतुक होत आहे. चाहते आता 'खतरों के खिलाडी'च्या नव्या सीझनची वाट पाहत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.