अजय देवगणचा 'दृश्यम 3' रिलीज
'दृश्यम 3' पहिल्या दिवशी हाऊसफुल
'दृश्यम 3' अजय देवगणचा सर्वात सुपरहिट चित्रपट
अजय देवगणचा 'दृश्यम ३: द कन्क्लूजन' (Drishyam 3: The Conclusion) चित्रपट आज (२ ऑक्टोबर) ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. 'दृश्यम' च्या पहिल्या दोन भागांना देखील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. 'दृश्यम ३' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे.
आतापर्यंत Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'दृश्यम ३'ने भारतात ९,१८८ शोमधून ३६.७० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येही बंपर कमाई केली आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'दृश्यम ३'ने भारतात ६०.१७ कोटी रुपयांची एकूण ग्रॉस कमाई नोंदवली आहे (यात 'ब्लॉक' केलेल्या जागांचाही समावेश आहे). ब्लॉक केलेल्या जागा वगळता, ॲडव्हान्स ग्रॉस कमाई ४९.२९ कोटी रुपये इतकी आहे. 'दृश्यम ३' च्या कलेक्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे.
'दृश्यम ३: द कन्क्लूजन' मध्ये अजय देवगणने 'विजय साळगावकर'च्या भूमिकेत आहे. चित्रपटात तब्बू, रजत कपूर, इशिता दत्ता आणि श्रिया सरन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. तसेच चित्रपटात जयदीप अहलावत आणि प्रकाश राज हे अभिनेते देखील आहेत. 'दृश्यम ३' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला आहे.
अजय देवगणच्या 'दृश्यम'चा हा तिसरा भाग आहे. पहिले दोन भाग खूप गाजले. आता तिसरा भाग पुन्हा धुमाकूळ घालायला येत आहे. 2015 ला 'दृश्यम' आणि 2022 ला 'दृश्यम 2' रिलीज झाला. दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली.