khatron ke khiladi 15: अ‍ॅडव्हेंचरचा नवा सीझन; 'खतरों के खिलाडी १५' मध्ये 'या' १२ सेलिब्रिटींची एन्ट्री

khatron ke khiladi 15: 'कलर्स' वाहिनीवरील 'खतरों के खिलाडी' हा कार्यक्रम एका नव्या पर्वासह टेलिव्हिजनवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. या पर्वात केवळ नवीन स्पर्धकच नव्हे, तर काही जुने सहभागी होणार आहेत.
khatron ke khiladi 15
khatron ke khiladi 15Saam Tv
Published On

khatron ke khiladi 15: खतरों के खिलाडी १५ हा शो लवकरच दूरदर्शनवर प्रदर्शित होणार आहे. सध्या या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाची थीमदेखील उघड करण्यात आली आहे; यावेळी याला "डर का नया दौर" असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमातील निश्चित स्पर्धकांची यादीही जाहीर करण्यात आली असून, यामध्ये जुन्या स्पर्धकांसह अनेक नव्या चेहऱ्यांची एन्ट्री होणार आहे. खतरों के खिलाडी १५ च्या प्रसिद्धीसाठी खास एक नवीन इंस्टाग्राम पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर, या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची माहिती देण्यात आली आहे.

करण वाही

दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक करण वाही, या पर्वात खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार आहे. यापूर्वी त्याने खतरों के खिलाडी ८ मध्ये सहभाग घेतला होता.

गौरव खन्ना

बिग बॉस १९ चा विजेता असलेला गौरव खन्नाचीही या शोमध्ये स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. बिग बॉसमुळे गौरव प्रचंड लोकप्रिय ठरला होता. आता, रोहित शेट्टीच्या या कार्यक्रमात तो विविध स्टंट्स करताना दिसणार आहे.

ऋत्विक धनजानी

या यादीतील तिसरे नाव टीव्ही अभिनेता ऋत्विक धनजानी याचे आहे. ऋत्विकने रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी ८ या कार्यक्रमात यापूर्वीच सहभाग घेतला होता.

khatron ke khiladi 15
Raja Shivaji Show Cancel: मुंबईतल्या प्रसिद्ध थिएटरमध्ये 'राजा शिवाजी'चा शो अचानक रद्द; प्रेक्षकांचा संताप अनावर

विशाल आदित्य सिंग

विशाल आदित्य सिंग देखील खतरों के खिलाडी च्या १५ व्या पर्वात दिसणार आहे. यापूर्वी त्याने ११ व्या पर्वात सहभाग घेतला होता. विशाल हा बिग बॉस १३ या रिअॅलिटी शोचाही एक स्पर्धक होता.

फरहाना भट्ट

फरहाना भट्ट देखील खतरों के खिलाडी १५ मध्ये विविध स्टंट्स करताना दिसणार आहे. यापूर्वी ती बिग बॉस १९ मध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने 'उपविजेती' म्हणून स्थान मिळवले होते.

अविनाश मिश्रा

या यादीतील सहावे नाव म्हणजे खुद्द अविनाश मिश्रा. बऱ्याच काळापासून अशा चर्चा सुरू होत्या की, अविनाश मिश्रा खतरों के खिलाडी १५ मध्ये सहभागी होणार आहे. अविनाश यापूर्वी बिग बॉस १८ मध्येही सहभागी झाला होता.

khatron ke khiladi 15
khatron ke khiladi 15: तुफानी स्टंट्स आणि जबरदस्त टास्क; 'खतरों के खिलाडी १५' मध्ये 'या' १२ सेलिब्रिटींची एन्ट्री

ओरी

रोहित शेट्टी यांच्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये ओरी सहभागी होणार आहे. ओरी हा अनेकदा सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये दिसून येतो आता मात्र तो विविध स्टंट्स करताना दिसणार आहे.

जस्मिन भसीन

या यादीतील आठवे नाव टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन. जस्मिन भसीन यापूर्वीही 'खतरों के खिलाडी'च्या ९ व्या भागात सहभागी झाली होती.

हर्ष गुजराल

स्टँड-अप कॉमेडियन हर्ष गुजरालचे नावही 'खतरों के खिलाडी 15' साठी निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी, हर्ष गुजराल हा करण जोहरच्या 'The Traitors' या शोमध्ये दिसला होता.

अविका गौर

अविका गौर हिचे नावही 'खतरों के खिलाडी 15' साठी निश्चित करण्यात आले आहे. ही अभिनेत्री यापूर्वी 'खतरों के खिलाडी 9' मध्ये सहभागी झाली होती.

शगुन शर्मा

शगुन शर्माचे नावही 'खतरों के खिलाडी 15' साठी निश्चित करण्यात आले आहे. शगुन शर्मा सध्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी २' या मालिकेत 'परी'ची भूमिका साकारताना दिसत आहे.

रुबिना दिलैक

रुबिना दिलैक ही पुन्हा एकदा 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसणार आहे. ही अभिनेत्री यापूर्वी खतरों के खिलाडी 12 सहभागी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com