Aai Bhadyane Hawi: आई भाड्याने हवी? केदार शिंदे यांचा नवा प्रयोग, लेक सना शिंदे साकारणार ही भमिका

Aai Bhadyane Hawi: दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांचा नवीन सिनेमा आई भाड्याने हवी? ची घोषणा केली आहे. या सिनेमाची त्यांची मुलगी सना शिंदे खास भूमिका साकारणार आहे.
Aai Bhadyane Hawi
Aai Bhadyane HawiSaam Tv
Published On

Aai Bhadyane Hawi: मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा नव्या आणि वेगळ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती सना शिंदे करत असून, प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सनफ्लॉवर स्टुडिओच्या बॅनरखाली साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केले आहे. तर छायांकन आणि संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ नंतर ही संपूर्ण टीम पुन्हा एकत्र येत असल्याने या चित्रपटाकडून अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.

Aai Bhadyane Hawi
Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची त्सुनामी! रणवीरने मोडले आमीर-शाहरुख-सलमानचे रेकॉर्ड, असा पराक्रम करणारा पहिलाच हिरो

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले की, स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही मोठी जबाबदारी असते. प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी कथा मिळाल्याशिवाय अशा चित्रपटांची सुरुवात करायची नाही, असा त्यांचा निर्धार होता. ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट केवळ विनोदी नसून ‘आई’ या नात्याचा गाभा उलगडणारा आणि भावनिक पातळीवर स्पर्श करणारा असेल. त्यांनी या चित्रपटात राजकुमार हिरानी यांच्या शैलीची झलकही असल्याचे नमूद केले.

Aai Bhadyane Hawi
Ashok Kharat Case: ...कंबरड्यात लाथ घालायला पाहिजे...; भोंदूबाबा खरातचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता संतापला

निर्माती सना शिंदे यांच्या मते, हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजनप्रधान, रंगतदार आणि मल्टीस्टारर असणार आहे. नातेसंबंध, भावना आणि विनोद यांचा सुंदर संगम यात पाहायला मिळेल. ‘आई’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा असून, तिच्या भावनिक पैलूंवर हा चित्रपट भाष्य करणार आहे.

आई भाड्याने हवी?’ या शीर्षकातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. बदलत्या कुटुंबव्यवस्थेत ‘आई’ या नात्याची उणीव आणि त्यामागील भावनिक पोकळी यावर हा चित्रपट हलक्याफुलक्या पद्धतीने प्रकाश टाकणार आहे. जून-जुलै महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, लवकरच कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. हा चित्रपट मनोरंजनासोबतच विचार करायला लावणारा ठरणार, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com