Kapuskonda Movie: सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले पुन्हा आमनेसामने; 'कापूसकोंडा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Kapuskonda Movie: सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कापूसकोंडा’ मराठी चित्रपट २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. रक्षाबंधनाला चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली.
Kapuskonda Movie
Kapuskonda MovieSaam Tv
Published On

Kapuskonda Movie: माणूस आणि प्राणी यांच्यातील भावविश्व, नातेसंबंध आणि कुटुंबातील भावनिक गुंफण एका वेगळ्या पद्धतीने मांडणारा ‘कापूसकोंडा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली. ही झलक पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘कापूसकोंडा’ येत्या २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत आणि व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीजसह स्टोरीवाला फिल्म सादर करत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी पटकथा व संवादलेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.

Kapuskonda Movie
Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले पुन्हा एकत्र

कापूसकोंडा’मध्ये ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले यांची महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे दोघे यापूर्वी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटात मधुराणी यांनी ‘कँडी’ ही मजेशीर भूमिका साकारली होती. आता ‘कापूसकोंडा’च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यांच्यासोबत नव्या पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील यांचीही प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे अनुभवी कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Kapuskonda Movie
Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

पहिल्या झलकने वाढवली उत्सुकता

चित्रपटाची कथा मानवी नातेसंबंध, कुटुंब आणि भावभावनांभोवती फिरते. मात्र, त्यामध्ये माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्यालाही महत्त्वाचे स्थान असल्याचे पहिल्या झलकवरून जाणवते.‘कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?’ अशा व्हॉइसओव्हरने झलकची सुरुवात होते. त्यानंतर मधुराणी गोखले आणि दोन मुली आश्चर्याने काहीतरी पाहताना दिसतात. पुढच्या दृश्यात अस्ताव्यस्त पसरलेल्या भांडीकुंडीच्या खोलीत सचिन पिळगावकर मांडीवर कुत्र्याला घेऊन काहीसे भेदरलेले दिसतात. या काही दृश्यांमुळे नेमकी ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ काय आहे, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो.

लातूरमध्ये झाले चित्रीकरण

चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावात करण्यात आले आहे. अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजाने चित्रपटातील गाण्यांना रंगत आणली आहे. अनोखी कथा, भावनिक नातेसंबंध आणि दमदार कलाकारांची साथ यामुळे ‘कापूसकोंडा’कडून प्रेक्षकांना वेगळ्या अनुभवाची अपेक्षा आहे. आता २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर कथेला आणि कलाकारांच्या अभिनयाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com