कपिल शर्माच्या The Great Indian Kapil Show ने दीड महिन्यातच बोजा बिस्तारा गुंडाळला, समोर आलं मोठं कारण

Kapil Sharma Show Off Air : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ हा शो गेल्या काही दिवसांपूर्वीच ओटीटीवर सुरू झाला होता. अवघे काही एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
The Great Indian Kapil Show Off Air
The Great Indian Kapil Show Off AirSaam Tv

The Great Indian Kapil Show Off Air

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ हा शो गेल्या काही दिवसांपूर्वीच ओटीटीवर सुरू झाला होता. अवघे ५ एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टिव्हीवर अनेक वर्ष टेलिकास्ट झालेल्या ह्या शोने ओटीटीवर प्रेक्षकांचे म्हणावे तसे खास मनोरंजन केले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून निर्मात्यांनी या शोच्या सेटची निर्मिती केली होती. पण आता अवघ्या काही दिवसांतच हा शो बंद पडणार आहे.

The Great Indian Kapil Show Off Air
Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ चा नुकताच पहिला सीझन संपला आहे. शेवटचा एपिसोड संपल्यानंतर शोमधील कलाकारांनी व्रॅपअप पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतले काही फोटोज् नुकतेच सोशल मीडियावर समोर आलेले आहेत. नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची ३० मार्चपासून सुरुवात झाली होती. नुकतंच या शोच्या शेवटच्या एपिसोडची शुटिंग संपली. शुटिंगनंतर शोमधील कलाकारांनी व्रॅपअप पार्टीचे आयोजन केले होते. शनिवारी (४ मे) या शोचा सहावा एपिसोड नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे. यावेळी शोमध्ये सनी देओल आणि बॉबी देओलने हजेरी लावली होती.

नुकतंच किकू शारदाने मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’च्या पहिल्या सीझनमध्ये एकूण १३ एपिसोड्स आहेत. त्यातील सर्वांचीच शुटिंग नुकतीच संपलेली आहे. लवकरच आम्ही दुसरा सीझनही घेऊन तुमच्या भेटीला येतोय. आम्ही दुसऱ्या सीझनबद्दलही नियोजन आधीच केलेले आहे. दुसऱ्या सीझनला जास्त वेळ लागणार नाही." काही मीडिया रिपोर्टनुसार, या शोसाठी कपिल शर्माला एका एपिसोडसाठी ५ कोटी रुपये मानधन मिळायचे. तर अर्चना पूरण सिंगला फक्त सोफ्यावर बसून हसण्यासाठी एका एपिसोडसाठी १० लाख रुपये मानधन दिले जाते.

The Great Indian Kapil Show Off Air
Anuj Thapar : अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल आला समोर, कुटुंबीयांनी केली सीबीआय चौकशीची मागणी, नेमकं कारण काय ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com