Jana Nayakan Advance Booking: थलपती विजय यांच्या 'जन नायकन'ची जबरदस्त क्रेझ; २,५०० रुपयांचे तिकीट, तरीही शो हाऊसफुल

Jana Nayakan Advance Booking: थलपती विजय यांचा अखेरचा चित्रपट मानला जाणारा 'जन नायकन' २३ जुलैला प्रदर्शित होणार आहे. २,५०० रुपयांची तिकिटेही हाऊसफुल होत असून आगाऊ बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळतोय.
Jana Nayagan
Jana NayaganSaam tv
Published On

Jana Nayakan Advance Booking: थलपती विजय यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्यांचा बहुचर्चित 'जन नायकन' (Jana Nayakan) हा चित्रपट २३ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा तमिळ ॲक्शन-थ्रिलर चित्रपट विजय यांच्या अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट आहे. त्यानंतर ते पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार असल्याने या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या एॅडव्हान्स बुकिंगला उत्तम मिळत आहे. विशेष म्हणजे, काही शहरांमध्ये प्रीमियम तिकिटांचे दर तब्बल २,५०० रुपये असतानाही अनेक शो हाऊसफुल झाले आहेत. 'बुकमायशो'वरील माहितीनुसार, बेंगळुरूमध्ये सकाळच्या शोसाठी तिकिटांचे दर १,२०० ते २,५०० रुपयांपर्यंत आहेत. इतर ठिकाणी तमिळ व्हर्जनच्या तिकिटांची किंमत साधारण १०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान असली, तरी चाहत्यांचा उत्साह किंचितही कमी झालेला नाही.

Jana Nayagan
Lock Upp: ५२ वर्षाच्या अभिनेत्याने सारखं सारखं kiss केलं; अभिनेत्री म्हणाली माझ्या बापानेसुद्धा इतके किस घेतले नसतील

दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाला तब्बल सात महिन्यांचा विलंब झाला होता. कायदेशीर वाद, पायरसीशी संबंधित अडचणी आणि सेन्सॉर प्रक्रियेतील विलंबामुळे चित्रपट रखडला होता. अखेर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निर्मात्यांना चित्रपटात १२ बदल करावे लागले. काही संवाद म्यूट करण्यात आले, तर काही सीन एडिट करण्यात आले आहे.

Jana Nayagan
Kangana Ranaut: 'CJPवाल्यांनो, हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा'; आंदोलनकर्त्यांना कंगना रणौत यांचे थेट आव्हान

'जन नायकन'मध्ये थलपती विजय यांच्यासोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू आणि गौतम वासुदेव मेनन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दमदार स्टारकास्ट, ॲक्शन आणि विजय यांचा अखेरचा चित्रपट ही तीन मोठी आकर्षणे असल्याने 'जन नायकन' बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. आता २३ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com