Indian idol 16 winner : 'इंडियन आयडॉल १६' ची ट्रॉफी कोणी जिंकली? ट्रॉफीसह मिळालं इतक्या लाखांचं बक्षीस

Indian Idol 16 Grand Finale : 'इंडियन आयडॉल १६' चा ग्रँड फिनाले नुकताच थाटामाटात पार पडला आहे. कोण विजेता ठरला आणि काय बक्षीस मिळाले जाणून घेऊयात.
Indian Idol 16 Grand Finale
Indian idol 16 winner SAAM TV
Published On
Summary

'इंडियन आयडॉल १६' चा ग्रँड फिनाले झाला

महिला गायिकेने बाजी मारली

विजेत्याला ट्रॉफीसोबत लाख रुपयांचे प्राइज मिळाले

लोकप्रिय शो 'इंडियन आयडॉल' चा नुकताच सोळावा सीझन पार पडला आहे. काल (२६ जुलै २०२६) रोजी या शोचा थाटामाटात ग्रँड फिनाले (Indian Idol Season 16 Winner) झाला. भारताला आणखी एक उत्तम गायक मिळाला. 'इंडियन आयडॉल १६' च्या विजेत्या ट्रॉफीवर ज्योतिर्मयी नायक (Jyotirmayee Nayak) हिने आपले नाव कोरले आहे. तिने आपल्या सुरेल आवाजाने अवघ्या जगाला वेड लावले.

सध्या ज्योतिर्मयी नायकवर सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहेत. नेटकरी तिच्या गाण्यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. ज्योतिर्मयी नायकही ओडिशाची राहणारी आहे. ग्रँड फिनालेमध्ये अंशिका चोणकर, मनराज वीर सिंग, मायस्मी बोस, सुहेल सुफी आणि तनिष्क शुक्ला या स्पर्धकांना मागे टाकत ज्योतिर्मयीने बाजी मारली असून ती विजेती ठरली आहे.

बक्षीस काय मिळाले?

'इंडियन आयडॉल १६' ची विजेती ज्योर्तिमयी नायक हिला विजेतेपदाची ट्रॉफीसोबत २० लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. 'इंडियन आयडॉल १६' मध्ये तनिष्क शुक्ला ही फर्स्ट रनर-अप ठरली. तिला ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. 'इंडियन आयडॉल १६' परीक्षक श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह होते.

Indian Idol 16 Grand Finale
Famous Actress : सिगारेटचा चटका दिला, वाटेल तिथे स्पर्श केला; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

टॉप 5 फाइनलिस्ट कोण?

  • सुहैल सूफी

  • अंशिका चोंकर

  • मनराज वीर सिंह

  • ज्योतिर्मयी नायक

  • तनिष्क शुक्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com