Pawandeep Rajan Health Update: 'इंडियन आयडॉल १२' चा विजेता आणि प्रसिद्ध गायक पवनदीप राजनची प्रकृती सध्या चिंताजनक असून तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. अलीकडेच त्याच्यावर तीन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, ज्यासाठी तब्बल आठ तास लागले. त्याच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, पवनदीप अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाहीत आणि डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली आहेत
ही गंभीर स्थिती एका अपघातामुळे निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी, पवनदीप आपल्या मित्रांसोबत दिल्ली नोएडाला जात असताना, त्याच्या कारचा चालक झोपेत गेला आणि कारचा ताबा सुटला. या अपघातात कार एका ट्रकच्या मागील भागाला धडकली, यामुळे पवनदीप गंभीर जखमी झाले.
त्यांच्या टीमने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, "नमस्ते, पवनच्या काल तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याला खूप वेदना होत होत्या. त्याच्या अनेक चाचण्या झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. ऑपरेशन आठ तास चालले आणि काही मोठ्या फ्रॅक्चरचे यशस्वीपणे ऑपरेशन करण्यात आले. तो सध्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे."
पवनदीप राजनने 'इंडियन आयडॉल १२' जिंकून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या गायन कौशल्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. सध्या त्याची प्रकृती सुधारण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. त्याच्या लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थन आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.