Anushka Sharma Birthday: वडील लष्करात, लेक झाली बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री; अनुष्का शर्माचा इथवरचा प्रवास आणि संपत्ती किती?

Happy Birthday Anushka Sharma: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
Anushka Sharma Birthday
Anushka Sharma BirthdayCanva

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तुमच्या लाडक्या अभिनेत्रीचा बॉलिवूड(Bollywood) प्रवास आणि तिच्या संपत्तीबद्दल.

Anushka Sharma Birthday
Kartik Aryan चा Killer Look : Bollywood Actor : Entertainment News | Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का काही काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे.अनुष्काने काही दिवसांपूर्वी तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे, त्या मुलाचे नाव अकाय असे आहे. अनुष्काला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये(Industry) कोणताही बॅगग्राउंड नव्हता तरीही तिने बॉलिवूडमध्ये एक हक्कांच स्थान निर्माण केलं आहे. अनुष्काने तिच्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अनेक चित्रपट केले आणि त्यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले देखील आहेत. बॉलिवूडच्या चर्चेत असलेल्या अभिनेत्रीमध्ये आजही अनुष्का शर्माचे नाव घेतले जाते.

व्हायरल व्हिडिओ...

अनुष्का शर्माने तिच्या वयाच्या साधारण १८ वर्षांची असताना पहिलं ऑडिशन दिलं होतं. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती सिंपल लुकमध्ये असूनही अत्यंत सुंदर दिसतेय शिवाय व्हिडिओत ती स्वत:बद्दलची माहिती सांगत आहे. अनुष्काने त्यावेळी डेनिम जीन्स त्यावर पांढऱ्या रंगाचा टॉप आणि त्यावर क्रॉप जॅकेट परिधान केलेले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला साधारण ६ लाखांपेक्षा अधिकचे व्हूज मिळाले आहेत.

पदार्पण..

अनुष्का शर्माने बॉलिवूड इंडस्ट्रीत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून पदार्पण केले. 'रब ने बना दी जोडी' हा तिचा चित्रपट २००८ साली रिलीज झाला होता,ज्यात ती बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत मुख्य भुमिकेत दिसून आली होती. त्यानंतर तिला अनेक चित्रपट काम करण्याची संधी मिळत गेली. अनुष्का शर्माचे पीके, बॅंड बाजा बारात तसेच परी आणि ए दिल है मुश्किल असे अनेक हिट चित्रपट आहेत.

वयक्तिक माहिती...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा जन्म १ मे १९८८ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला. अनुष्का एका लष्करी कुटुंबातील आहे. अनुष्का शर्माचा नवरा प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. यांचा विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडला होतो.

अनुष्का शर्मा एक अभिनेत्री असून तिचे अनेक कपड्यांचे ब्रॅंड देखील आहेत. तसेच ती श्याम स्टील आणि मिंत्राची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तसेच तिचे मुंबईतील वरळी येथे एका आलिशान फ्लॅट आहे, ज्यांची किंमत साधारण ९ कोटी आहे. तसेच तिचे दिल्लीतही एक घर आहे.

Anushka Sharma Birthday
#boycottbollywood : ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा इतिहास थोडक्यात जाणून घ्या ! | Entertainment | Movies

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com