Gujrati actress On Election: गाफील राहून चालणार नाही...; गुजराती अभिनेत्रीचा अस्खलित मराठीमध्ये मोलाचा सल्ला

Gujrati actress On BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर गुजराती अभिनेत्रीचा एक मराठीत बोलणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून तिने महाराष्ट्रातील नागरिकांना मतदान करण्याचा सल्ला दिला आहे.
Gujrati actress On Election
Gujrati actress On ElectionSaam tv
Published On

Gujrati actress On Election: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे.या राजकीय वातावरणात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात लोकप्रिय गुजराती अभिनेत्री जिगना त्रिवेदी स्पष्ट मराठीत बोलताना दिसते आणि मुंबई व महाराष्ट्रच्या भविष्याशीसंबंधी मत मांडताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये जिगना त्रिवेदीने लोकांना मतदान करण्याचे आवाहन देत आहे. ती म्हणाली, नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? महाराष्ट्र राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मतदान करायला तयार आहात का? जेव्हा आपण कपडे विकत घेतो तेव्हा आपण नीट विचार करतो. बाईने जर दोन-तीन दिवस भांडी नाही घासली तर तक्रार करतो. आता आपलं महाराष्ट्र राज्य पुढच्या पाच वर्षात कोणाच्या हातात द्यायचा आहे याचा निर्णय घेण्याची संधी आहे. गाफील राहून चालणार नाही. मुंबई हे विकसित शहर होतेचं. गेलं कित्येक वर्षांपासून लोक इथे काम करायला येतात. त्यामुळे केवळ मुंबई विकसित करून चालणार नाही. तर, ग्रामीण भागातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासाकडेही बघा.

Gujrati actress On Election
Akshay Kumar: 'बाबा खूप कर्जात बुडालेत'; मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारला मुलीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

तिने पुढे सांगितले की विकास हा महत्त्वाचा आहे. पण आपल्याला असा विकास नकोय जिथे आपला श्वास गुदमरेल. आपली पुढची पिढी शारीरिकदृष्ट्या कमकुवत निघेल. आपल्यासमोर कितीतरी डोळे उघडणारा वास्तव आणि फॅक्ट्स आहेत. त्याच्याकडे बघा. मुंबई आता संधी आणि वेळ दोन्ही आहेत. आता तुमची चॉईस कोण चांगलं किंवा वाईट यामध्ये नाही. तर कोण कमी वाईट आहे आणि कोण जास्त वाईट आहे याच्यात आहे. आता आपला महाराष्ट्र खऱ्या राजाच्या हातात द्यायची ही संधी आहे. ही संधी चुकवू नका. जय महाराष्ट्र.

Gujrati actress On Election
Dry Skin: थंडीमुळे हात-पाय रफ आणि ड्राय झाले आहेत का? मग सॉफ्ट स्क्रिनसाठी वापरुन पाहा हे घरगुती उपाय

विशेष गोष्ट म्हणजे जिगना त्रिवेदीने हे सर्व सकाळी मराठीतच सांगितले, यामुळे तिचा व्हिडिओ महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत प्रचंड प्रमाणात पाहिला जात आहे. तिच्या वक्तव्यातून राज ठाकरे यांच्या विचारांना अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला असेही काही सोशल मीडिया वापरकर्ते म्हणत आहेत. हा व्हिडिओ आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत कारण एका गुजराती अभिनेत्रीने स्पष्ट, समंजस आणि प्रामाणिक मराठीतून मतदारांना योग्य निर्णय घेण्याचे संदेश देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com