Dry Skin: थंडीमुळे हात-पाय रफ आणि ड्राय झाले आहेत का? मग सॉफ्ट स्क्रिनसाठी वापरुन पाहा हे घरगुती उपाय

Dry Skin Remedy: हिवाळा सुरू होताच त्वचेच्या समस्या वाढू लागतात. थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचा रुक्ष होते. यासाठी आजीने सांगितलेली हा घरगुती उपाय.
Dry Skin
Dry SkinSaam tv
Published On

Dry Skin Remedy: हिवाळा सुरू होताच त्वचेच्या समस्या वाढू लागतात. थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचा रुक्ष होते, ओठ फुटतात, हात-पाय कोरडे पडतात तसेच अनेकांच्या टाचांनाही भेगा पडतात. अशा वेळी महागडे सौंदर्यप्रसाधने वापरण्यापेक्षा आजीने सांगितलेले जुने घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात.

हिवाळ्यात त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. सतत गरम पाण्याने अंघोळ करणे, हीटरचा वापर आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. याचा परिणाम म्हणून त्वचेला खाज येणे, त्वचा लालसर होणे आणि टाचांना भेगा पडणे अशा समस्या निर्माण होतात. मात्र काही सोप्या सवयी आणि घरगुती उपायांनी या त्रासापासून सहज सुटका मिळू शकते.

Dry Skin
Wight Loss Food: वजन कमी करण्यासाठी आजपासूनच टाळा हे ५ पदार्थ, १० दिवसात दिसायला लागेल फरक

आजीच्या मते, अंघोळीनंतर त्वचा थोडी ओलसर असतानाच नारळ तेल किंवा बदाम तेल लावावे. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. कोरड्या त्वचेसाठी दूध आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ व चमकदार होते. तसेच दही आणि बेसनाचा लेप आठवड्यातून एकदा लावल्यास मृत पेशी (डेड सेल) निघून जातात.

Dry Skin
Ilkal Saree Dress: पार्टी आणि समारंभासाठी खास इरकल साडीपासून तयार करा हे 7 सुंदर स्टाईलिश ड्रेस

हिवाळ्यात पायाच्या टाचा फाटण्याच्या समस्या अनेकांना भेडसावते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात भिजवून स्वच्छ करावेत. त्यानंतर नारळ तेल, तूप किंवा पेट्रोलियम जेली लावून मोजे घालावेत. काही दिवसांतच टाचांची त्वचा मऊ होऊ लागते.

यासोबतच भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. थंडीमुळे तहान कमी लागते, पण शरीरातील पाण्याची कमतरता त्वचेवर लगेच दिसून येते. आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश केल्यास त्वचेला आतून पोषण मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com