Akshay Kumar
Akshay KumarSaam Tv

Akshay Kumar: 'बाबा खूप कर्जात बुडालेत'; मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारला मुलीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

Akshay Kumar: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये गुरुवारी मतदान होत आहे. अनेक अभिनेते, चित्रपट निर्माते आणि सेलिब्रिटी मतदान करण्यासाठी येत आहेत, परंतु यावेळी अक्षय कुमार हा सर्वाधिक चर्चेत आला आहे.
Published on

Akshay Kumar: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान सुरू आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सर्वप्रथम मतदान केले. त्याची पत्नी ट्विंकल खन्ना त्याच्यासोबत होती. मतदान केल्यानंतर अक्षय म्हणाला, "आज रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे. मी सर्व मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन करते."

एका मुलीने अक्षयकडे मदत मागितली

मतदान केल्यानंतर आणि माध्यमांशी संवाद साधल्यानंतर, अक्षय त्याच्या गाडीकडे चालत जात असताना एक मुलगी त्याच्याकडे आली. ती मुलगी म्हणाली, "माझे वडील खूप कर्जात बुडाले आहेत. कृपया त्यांना मदत करा." अक्षयचे बॉडीगार्ड मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाही अक्षय थांबला आणि तिच्याशी बोलला.

Akshay Kumar
Wight Loss Food: वजन कमी करण्यासाठी आजपासूनच टाळा हे ५ पदार्थ, १० दिवसात दिसायला लागेल फरक

अक्षयने मुलीला काय म्हटले?

अक्षयने तिला तिचा फोन नंबर त्याच्या बॉडीगार्डला देण्यास सांगितले. हे ऐकून ती मुलगी भावुक झाली आणि अक्षयच्या पाया पडल्या यावर स्त्री सन्मान म्हणून अक्षयनेही तिला नमस्कार केला. त्यानंतर पुन्हा अक्षयने त्याच्या बॉडीगार्डला मुलीचा नंबर लिहून ठेवण्यास सांगितले. अक्षयचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Akshay Kumar
Avneet Kaur: पिंक बार्बी डॉल...; अवनीत कौरचा एलिगन्ट ग्लॅमरस लूक पाहिलात का?

या सेलिब्रिटींनीही केलं मतदान

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना व्यतिरिक्त, तमन्ना भाटिया, गुलजार, हेमा मालिनी, आमिर खानचे कुटुंब, सचिन तेंडुलकर आणि सुनील शेट्टी हे हे वृत्त लिहिताना मतदान करण्यासाठी पोहोचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com