Shruti Vilas Kadam
अभिनेत्री अवनीत कौरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर गुलाबी रंगाच्या सुंदर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या असून, सोशल मीडियावर ती पुन्हा चर्चेत आली आहे.
एका चाहत्याने लिहिले, “बहुत सुंदर और खूबसूरत,” तर दुसऱ्याने “गुलाबी कपड़ों में खूबसूरत लड़की” असे म्हणत तिचं कौतुक केलं.
अवनीतने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात राणी मुखर्जींच्या ‘मर्दानी’ (2014) या चित्रपटातून केली होती.
ती नुकतीच ‘लव इन वियतनाम’ या चित्रपटात दिसली असून, याआधी ‘लव की अरेंज मैरिज’ या चित्रपटात झळकली होती.
अवनीतने या फोटोशूटमध्ये आपल्या स्टाइल आणि एलिगन्सने चाहत्यांना इंप्रेस केले आहे. तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक होत आहे.
या फोटोंमुळे अवनीतची ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात अधोरेखित झाली आहे.