Gayatri Datar: मराठी अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; कॅब कॅन्सल केली, चालकाने फोन नंबर केला व्हायरल

Gayatri Datar: मराठी अभिनेत्री गायत्री दातार सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. कॅब कॅन्सल केली म्हणून कॅब ड्रायव्हरने तिच्यासोबत वाईट वागणूक करत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Gayatri Datar
Gayatri DatarSaam Tv
Published On

Gayatri Datar: मराठी अभिनेत्री गायत्री दातार सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. कॅब ड्रायव्हरने तिचा मोबाईल नंबर शेअर केल्याचा आरोप करत तिने सोशल मीडियावर आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. मात्र, या प्रकरणात ती पोलिसांत FIR दाखल करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री दातारने मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी ऑनलाइन कॅब बुक केली होती. मात्र काही कारणांमुळे तिने ही कॅब वेळेआधीच रद्द केली. यानंतर त्या कॅब ड्रायव्हरने तिला सतत फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर तिचा मोबाईल नंबर इतरांसोबत शेअर केला यामुळे तिला वेगवेगळ्या फोन नंबरवरून फोन येऊ लागल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

Gayatri Datar
Actor Divorce: प्रसिद्ध अभिनेत्याच्या आयुष्यात वादळ, ११ वर्षांनंतर संसार मोडणार? बायकोने दिले संकेत

गायत्रीने सोशल मीडियावर सांगितले की, 'तो कॅब ड्रायव्हर मला सकाळपासून- दुपारपर्यंत सतत वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन करत राहिला. त्याने माझा पर्सनल नंबर एका ग्रुपवरही शेअर केला होता. यामुळे मला सतत फोनकॉल्स येत होते. ड्रायव्हर वेगवेगळ्या नंबरवरून सतत कॉल करत होता, शिवीगाळ करत होता आणि त्यामुळे मी प्रचंड घाबरले. मला माझ्या सोसायटीच्या बाहेर पडायलाही भीती वाटत होती. पण, माझा एक मित्र पोलीस अधिकारी आहे. त्याने मला या प्रकरणात मदत केली. त्यानंतर त्या माणसाने मला फोन करणं थांबवलं आहे.' असे ती म्हणाली.

Gayatri Datar
Pooja Sawant: मोत्याची माळ अन् नजरेत नखरा; करलफुलचा पूजा सांवतचा ग्लॅमरस अंदाज

या घटनेनंतर अनेकांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. मात्र, गायत्रीने FIR दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या मते, या प्रकरणातून पुढे जाऊन स्वतःच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणे आणि अशा घटनांविषयी जागरूकता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. गायत्री दातारने या अनुभवातून लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही तिने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com